नरळद येथील कँनाल व चारी चे बांधकामाच्या चौकशीची मागणी
मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.११: मौज नरळद व कोथाळा येथे होत असेलेल्या लोअर दुधना कँनॉल व चारी च्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची चौकशीची मागणी आज दि.११ डिसेंबर रोजी येथील गावकरीनी निवेदनाद्वारे तहासिलदार आश्विनी जाधव मानवत यांच्याकडे केली आहे.
मानवत तालुक्यातील नरळद व कोथाळा येथे लोअर दुधना धरणाच्या उजव्या कँनॉल चे काम बालाजी कन्स्ट्रक्शन गुतेदार सोमाणी व अशिष झवर यांच्या कंपनी कडे बांधकाम आहे.लोअर दुधना प्रकल्पाचे उजव्या कालव्याच्या कँनॉलच्या बांधकामात अत्यंत हलक्या ( निकृष्ट ) दर्जाचे मटेरीअल वापरत आसल्याचे नरळद व कोथाळा येथिल नागरिकांनी तहासिलदार यांना दिलेल्या निवेदनात चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच दुधना नदी पाञातील अवैध रेती उत्खनन उपसा लोअर दुधना धरणाच्या कँनॉलच्या व चारीच्या कामासाठी बालाजी कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणावर उत्खनन करत आहे या मुळे नरळद व कोथाळा या गावातील मुक्या व रानटी जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न निर्माण होत आहे .असे निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन मानवत तालुका काँग्रेस अ.जा.चे तालुका अध्यक्ष अंबादास तुपसमुंद्रे यांचा मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनावर हारीभाऊ गिरी , राधाकिशन निर्वळ ,रामकिशन सावंत , सुनिल तुपसमुंद्रे , कृष्णा निर्वळ , नवनाथ सावंत ,सतिश जनार्धन निर्वळ ,गोविंद निर्वळ , अनिल निर्वळ ,परशराम निर्वळ ,मारोती नवगीरे , आसाराम वाकळे ,ऋषीकुमार कणरी , शुंभम खरात , रंगनाथ करडिले बाबासाहेब करडिले व नरळद व कोथाळा येथिल नागरिकांची या निवेदनावर स्वाक्षरी आहेत व लवकरात लवकर लोअर दुधना कँनॉलच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी निवेदनात देण्यात आला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें