तांदुळवाडी येथील श्री छत्रपति संभाजी विद्यालयत संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी
शेख सलिमभोकरदन प्रतिनिधी
भोकरदन तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री छञपती संभाजी विद्यालय तांदुळवाडी मध्ये आज दि 20 डिसेंबर ला संत गाडगे महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी प्राचार्य संजय पैठणकर यांनी संत गाडगे महाराज यांच्या कार्याचा गौरव केला व आज ही अशाच कार्याची,विचारांची,मार्ग दर्शनाची सर्व समाजाला आहे असे विचार प्रगट केले. संत गाडगे महाराज यांनी सुरू केलेली स्वच्छता मोहीम चीच दखल घेऊन आजही संपुर्ण देशात स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. तेव्हा संत गाडगे महाराज यांचे विचार आत्मसाथ करण्यासाठी आजच्या तरुण पिढी ने ,स्वच्छता मोहीम राबवावी ,व्यसनापासून दूर रहावे,असे आवाहन ही यावेळी प्राचार्य संजय पैठणकर यांनी केले. यावेळी विद्यालयाचे सहशिक्षीक श्री डी बी ठाकरे यांनी ही संत गाडगे महाराज यांची शिकवण विद्यार्थ्यांना सांगितली तर सहशिक्षीक श्री के व्ही फुके,पी एम पाटील,व्ही बी कल्याणकर,प्रा समाधान सोनवणे श्रीमती उषाताई खैरे मॅडम, सौ कमलाबाई सोनवणे मॅडम, जे एच सुरासे,एम बी भंडारे,एच यु गव्हाड सह विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें