- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 दिसंबर 2017

कै,डॉ,अशोकराव जोगदंड यांचा स्मृतिदिन संपन्न,,,,                         सेलू दि, 28                                               राजश्री छत्रपती शाहू शि, प्र, मंडळ  संस्थापक अध्यक्ष कै, डॉ,अशोकराव जोगदंड यांचा स्मृतिदिन जिजामाता बालविद्या मंदिर येथे संपन्न झाला,,या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ,अनिकेत जोगदंड  तसेच कार्याध्यक्ष माधवराव डख उपस्थित होते, स्मृती दिना निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे परीक्षक   जेष्ठ साहित्यिक गौतम सूर्यवंशी ,  बाबासाहेब चारठणकर,  डॉ, अनुराग जोगदंड, सतीश जाधव, सुनील गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते,              कार्यक्रमाची सुरुवात कै,डॉ,अशोकराव जोगदंड यांचे प्रतिमा पूजनाने झाली, कार्यक्रम प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी केले, त्यानंतर गौतम सूर्यवंशी यांनी लेखन कसे करावे या विषयी मार्गदर्शन केले व दोन कविता सादर करून मंत्रमुग्ध केले, या नंतर  निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले, या मध्ये नूतन कन्या प्रशाला ची सानिका सुहास देऊळगावकर प्रथम,  विवेकानंद प्रा, शाळेचा अभिजित भगवान पावडे द्वितीय तर नूतन कन्या प्रशाला ची अनुजा चंद्रकांत पांचाळ तृतीय या विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र वाटप मान्यवर यांचे हस्ते प्रदान करण्यात आले,,, या स्पर्धेमध्ये यशवंत, शारदा, श्री के,बा, जिजामाता प्राथमिक शाळेतील सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, या वेळी मार्गदर्शक शिक्षिका कीर्ती राऊत व सुनील गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले, अध्यक्षीय समारोप करताना डॉ, अनिकेत जोगदंड यांनी कै,डॉ,जोगदंड यांच्या आठवणींना उजाळा दिला व प्रत्येक महिन्याचे पहिल्या सोमवारी जिजामाता प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तथा पालक यांचे आरोग्य तपासणी करण्याचे आश्वासीत केले,,, कार्यक्रम सूत्र संचलन मंगेश शेळके, तर आभार भगवान पावडे यांनी मानले,, कार्यक्रम यस्वीतेसाठी काळे विजयमाला, खापरखुंटीकर कृष्णकांत, कटारे विष्णू, राठोड सुनील, धनवें बाळू, तुकाराम अंभुऱे यांनी परिश्रम घेतले,,,,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें