*पारडी येथे पार पडला बालकुमार मेळावा*
*बालपण हा आयुष्यातला प्रथम पाऊस .तेव्हा ह्याचे योग्य व्यवस्थापन झालं तर आपले जीवन सुंदर बनेल*
.---बबन शिंदे
यांचे प्रतिपादन.
*ज्ञानप्रबोधिनी पुणे व जि प शाळा पारडी* च्या वतीने .काल 29 डिसेंम्बरला बाळकूमार मेळावा
आयोजित करण्यात आला होता.तेव्हा ते बोलत होते .
*करील मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी त्याचे*
या परमपूज्य आदरणीय साने गुरुजी यांच्या उक्तीप्रमाणे जि.प.प्रा.शा पारडी येथे बालकुमार मेळावा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमात उदघाटन सोहळा सकाळ सत्रात पार पडला.या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच
*सौ.आश्विनीताईराठोड* तसेच प्रमुख अतिथी केंद्र प्रमुख कन्या वालूर *अनंतकुमार देवळे*, शा.व्य.स.अध्यक्ष अमोल आढे, साहेबराव लघें , मुख्याध्यापक कुरेशी सर, ग्रामसेवक गोस्वामी सेलू येथील कवी सुरेश हिवाळे,त्र्यंबक वडसकर, सुहास देऊळगावकर,सौ.देशमुख मॅडम,माऊली राठोड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.प्रथम शाळेच्या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला .
सोबतच शाळेचा बालवाचनाल्याचे उद्धाटन करण्यात आले .
शाळेला अनेक लोक कशे मदत करतात हे एक उदारण देऊन पुणे येथील समाजशेवी मित्र हेमंत पाटील व इतरांनी 3000 रुपयांचा चेक पाठविला हे आवर्जून युवराज माने यांनी सांगितले .
द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांसाठी कथाकथन स्पर्धा झाली. यात सानिका देऊळगावकर, तन्मय माने,श्रद्धा वडस्कर, आदित्य खरात,काजल राठोड,देवहूती गाजपुरकर आदी विद्यार्थ्यांनी उत्तम कथा सादर करून श्रोथ्यांना मंत्रमुग्ध केलं. यावेळी देवहूती या विध्यार्थिनींची कथा ऐकून अनेकांना अश्रू अनावर झाली.
कथाकथनानंतर सर्वानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. सर्वांना सोबत जेवताना खुप आनंद मिळाला.
दुपार सत्रात विद्यार्थ्यांसाठी खास लेखक आपल्या भेटीला या खास संवादपर सत्रात बालसाहित्यिक *बबन शिंदे* कळमनुरी ,सेलू येथील
साहित्यिक *जयश्री सोन्नेकर*,कवी *दिगंबर भिसे*,उपक्रमशील शिक्षक माधव गव्हाणे, योगेश ढवारे,रूपनर , कुकडे ,सामाजिक कार्यकर्ते *सुनील गायकवाड*, सतीश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना दिगंबर भिसे म्हणाले की," शाळा हे समाजविकासाचे खरे साधन असुन इथे आल्यावर हे स्पष्टपणे जाणवले"… त्यांनी गीते सादर करून आसमंतात नवचैतन्य आणले.
योगेश ढवारे यांच्या वावा या तमिळ गीतावर विद्यार्थ्यांनी
ताल धरला. यांनी मुलांना उपक्रमाची माहिती व महत्व समजावून दिले .
जयश्री सोन्नेकर यांनी मार्मिक विचार मांडले व का? ही कविता सादर केली.
शिक्षण हे किती महत्वाचे साधन आहे .यासाठी शांत बसू नका ,सतत धडपडत रहा , आणि मिळावा हा सल्ला सोंनेकर यांनी दिला . शाळेतील वातावरण पाहून मी भारावून गेले ।व आम्ही पण शिक्षक पण एवढ सुंदर काम खेड्यात पहाताना मला आनंद झाला असे त्या म्हणाल्या .त्यांनी ज्ञानप्रबोधिनी पुणे याचे खास आभार व्यक्त केले .
बालसाहित्यिक बबन शिदे यांनी विद्यार्थी मुक्त संवाद साधून राजाची कथा व कविता सादर केल्या. त्यांनी मुलांचे अनेक प्रश्न हाताळून प्रश्नांना उत्तरे देत कविता ऐकवल्या .त्यांनी कथा कशा सुचतात .कश्या फुलतात अश्या अनेक अंगांनी आपले मनोगत मुळापर्यंत पोहचवले .
त्यांनी अनेक मासिकातील प्रकाशित आपल्या कथा सांगितली . शेवटी बबन शिंदे यानी विध्यार्थ्यांना अनेक यश मीळविण्याचे मंत्र दिली .
शाळेच्या विकासात गाव कसं महत्वाचे हे त्यांनी गावकऱ्यांचे कौतुक करत करत स्पष्ट केलं.
अनेक वर्षे या पक्षात आं करताना असे अनेक कार्यक्रम मी केली पण आजचा कार्यक्रम खास ज्ञानोरबोधिनी पुणे व पारडी शाळेने घेतला व यशस्वी करून दाखवला याचे खूप कौतुक वाटत.असे ते म्हणाले .
यावेळी त्यांनी छत्रप्रबोधन या मासिकविशी माहिती दिली . सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी आपल्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली .त्यांनी मुलांना सांगितले कि कोणतंच काम हे लहान नसते , कोणतेही काम मनापासून केल्यास पूर्ण होते .तेव्हा सर्वांना मदत करा असे आव्हान त्यांनी केले .पुढील कार्यक्रमास माझ्याकडून आपल्या शाळेला मी बक्षीस देतॊ असे त्यांनी जाहीर केलं .शाळेचे व सर्व शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले . मा।केंद्रप्रमुख यांनी एकंदरीत सर्व कार्यक्रमावर आपले अध्यक्षीय भाषण सादर केले .त्यांनी सर्व गावकऱ्यांचे खूप आभार माने ।
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश नरशिंगकर यांनी केले ते बहारदार सूत्रसंचलन युवराज माने यांनी केले. कार्य कर्माचे आभार संजय काकडे यांनी मानले .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मा.शेळके,गव्हाणे, दवारे , काकडे ,सुभाष लघें, कुमार लघें, शिक्षिका राठोड आदींनी खूप म्हेनंत घेतली
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें