*श्रीराम प्रतिष्ठान तर्फे सुरभि महोत्सवाचे आयोजन*
समशेर खान.प्रतिनिधी. सेलू.
सेलू :- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवाचे आयोजन दि.१७ डिसेंबर ते २१ डिसेंबर या दरम्यान विद्याविहार संकुल रवळगाव रोड सेलू येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात क्रीडा दिन, सर्व घटक संस्थेतील शाळा व महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम तसेच आनंद मेळावा आदी कार्यक्रमाची मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरभी महोत्सवाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक मा. दिलीपजी झळके यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी डॉ. संजय रोडगे, विशेष अतिथी म्हणून मराठवाडा शिक्षक आमदार मा.विक्रमजी काळे, प्रमुख उपस्तिथी स्काऊट आणि गाईडचे जिल्हा मुख्य आयुक्त मा.संतोष बोबडे, जिल्हा क्रीडा अधिकारी मा.चंद्रशेखर साखरे, न.प.चे उपनगराध्यक्ष मा.प्रभाकर सुरुवसे आदी मान्यवर उपस्थित राहणार असून या दिनी पथसंचलन, लेझीम, ड्रील, कराटे, आदी प्रात्यक्षिकाचे सादरीकरण क्रीडा दिनी दि. १७ डिसेंबर सकाळी ९.०० वाजता शालेय विद्यार्थी करणार आहेत. प्रिन्स इंग्लिश स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रम दि. १८ डिसेंबर साय ५.०० वाजता आयोजन करण्यात आला असून अध्यक्षस्थानी डॉ.रामरावजी रोडगे, उद्घाटन जिंतूर-सेलू विधानसभेचे मा.आमदार विजयरावही भांबळे, जि.प. सदस्य मा. राजेंद्रकाका लहाने यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख उपस्थिती जि.प.सदस्य मा.रामनाना खराबे, सेलू न.प.चे मुख्याधिकारी मा.देविदास जाधव, पाथरी कृ.उ.बा.सचे सभापती अनिलभाऊ नखाते, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष मा. आनंद भरोसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ज्ञानतीर्थ विद्यालयाचा रंग मराठी मातीचा या सांस्कृतिक कार्यक्रम दि. १९ डिसेंबर साय ५.०० वाजता आयोजन करण्यात आला असून अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव डॉ. साविता रोडगे, उद्घाटन विधान परिषदेचे आमदार मा. बाबाजानी दुरांनी साहेब, सेलूचे तहसिलदार मा.स्वरूप कंकाळ प्रमुख उपस्थिती जि.प.सदस्या इंद्रायणी रोडगे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशउपाध्यक्ष मा. छगन दादा शेरे, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष मा. बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
एकात्मिक आदिवासी प्रकल्पाचा सांस्कृतिक कार्यक्रम दि. २० डिसेंबर साय ११.०० वाजता आयोजन करण्यात आले असून अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, उद्घाटक कळमनुरीचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड, जि.प. सदस्य मा. रामराव उबाळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत तसेच साय ५.०० वाजता आनंद मेळावा, अपूर्वा पॉलीटेक्निक, डीएड, बीएडचा जल्लोष तरुणाईचा ह्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.रामरावजी रोडगे, उद्घाटक जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. प्रवीण देशपांडे, साम टीव्ही रिपोर्टर राजेश काटकर देशैन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी मा. सुरज कदम, लोकमत जिल्हा प्रतिनिधी मा.अभिमन्यू कांबळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत आणि महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मा. कल्पना पाटील यांचा सुरेल गीतांचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रिन्स अकडमी सी.बी.एस.ई स्कूलचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक जिल्हाधिकारी मा. राहुल कर्डीले साहेब यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, प्रमुख उपस्थितीत परभणी जि.पच्या उपाध्यक्षा मा. भावनाताई नखाते, उपविभागीय अधिकारी मा. रेणुका वागळे-बागडे, सेलू न.प.चेनगराध्यक्ष मा.विनोदरावजी बोराडे आदी मान्यवर दि. २१ डिसेंबर साय ०५.०० वाजता उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी सुरभी महोत्सवाचे आयोजन शाळेतील पालक व सेलुवासियांसाठी करण्यात येते. या महोत्सवासाठी जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवहान आयोजक डॉ. संजय रोडगे यांनी केले आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें