- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 21 दिसंबर 2017

आमठाणा येथे वारकरी संप्रदाय मंडळाची बैठक गुरुवार रोजी संपन्न .

आजय बोराडे.
   आमठाणा  :  सिल्लोड तालुक्यातील ह. भ. प. महाराज , वादक , गायक , भजनी मंडळ , गावागावातील वारकरी मंडळी यांनी सर्वांनी एकत्र येऊन तालुक्यात संघटीत स्वरूप देऊन सिल्लोड तालुका वारकरी संघटना स्थापन करण्यात यावी या उद्देशाने आमठाणा येथे गुरुवार रोजी दुपारी विठ्ठल मंदिरामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोणी विक्रुत पद्धतीने आपल्या धर्मावर, संप्रदायावर कोणी हेतुपुरस्कर टीका करत असेल तर त्यांना संत साहित्याच्या माध्यमातून उत्तर देण्यासाठी ही संघटना काम करेल, ज्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होत नाही अशा ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून कीर्तनकार आपली सेवा बजावतील, सामाजिक जनजागृतीवर अधिक भर देण्यात येईल असा ठराव बैठकीत घेण्यात आला.
  या प्रसंगी कापरसिंग महाराज वांजोळेकर , माणिक महाराज राकडे , विठ्ठल महाराज गायकवाड , भाऊलाल महाराज पुरी, सामाजिक कार्यकर्ते पुंजाराम आप्पा गरूड  यांच्यासह पेंडगाव , चारणेर , धावडा , रेलगाव , केळगाव ,आदि गावातील वारकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें