- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 दिसंबर 2017

पश्चिम विभागिय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा कार्यालयाचे उद्घाटन

सेलू ( समशेर खान   )येथील नूतन महाविद्यालय व स्वा.रा.ती.म.विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने , नूतन महाविद्यालया च्या सुर्वण महोत्सव निमित्ताने , पश्चिम विभागिय आंतरविद्यापीठ खो-खो स्पर्धा चे आयोजन दि. 2 ते 6 जाने. दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या जय्यत तयारी करीता क्रीडा कार्यालयाचे उद्घाटन नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा राज्य तील 55 विद्यापीठ सहभागी होणार आहे.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली , या प्रसंगी संस्थेचे , प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, संस्था सचिव डी.के.देशपांडे, सहसचिव डॉ. व्ही. के.कोठेकर, श्री जयप्रकाश बिहाणी,श्री दत्तराव पावडे, माजी आ.श्री हरिभाऊ लहाने, उपनगराध्यक्ष श्री प्रभाकर सुरवसे, साईबाबा बँकेचे अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर, नगरसेवक श्री संदिप लहाने,श्री मनिष कदम, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते. बैठकीत स्पर्धेच्या आयोजन बाबत चर्चा करून विविध समितीचे गठन करण्यात आले.  कार्याक्रमाचे  प्रास्ताविक उपप्राचार्य श्री यादव गायकवाड यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. संतोष दंडवते, तर आभार प्रदर्शन रविकिरण गंभीरे, यांनी मानले.
कार्यक्रम साठी क्रीडा संचालक प्रा.के.के.कदम,.प्रा.नागेश कान्हेकर, मुख्याध्यापक के.व्हि.वाघमारे, नरेंद्र पाटील, अनिल रत्नपारखी,  चंद्रशेखर नावाडे, सर्जेराव लहाने, मोहन पाटील,
डी.डी. सोन्नेकर, किशोर ढोके, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें