- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 16 दिसंबर 2017


विद्यार्थी जीवनात रंग भरनारी स्पर्धा- अशोकराव काकडे

समशेर खान.
सेलू : येथील नूतन विद्यालयात कै. श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंतीचे औचित्यसाधून घेण्यात आलेल्या रंग भरन स्पर्धेचे बक्षिस वितरण शनिवार ता. १६ रोजी नूतन विद्यालयाच्या प्रार्थना मैदानावर संपन्न झाले. अध्यक्ष म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक काशिनाथ वाघमारे हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती अशोक काकडे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांची उपस्थिती होती. मंचावर पर्यवेक्षक अशोक गाजरे, मा.मा. सुर्वे हे उपस्थित होते.
     आपल्या मनोगतात अशोक काकडे म्हणाले की," शालेय जीवनात आयोजित विविध स्पर्धेतूनच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतं असतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला हवा. सेलू नगरीचे शिल्पकार आणि शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहचिणारे कै. श्रीरामजी भांगडीया यांच्या जयंती निमित्ताने आयोजित ही रंग भरन स्पर्धाही विद्यार्थी जीवनात रंग भरणारी अशीच आहे. या स्पर्धेतून नक्कीच भावी काळात चिञकार घडतील." जयप्रकाशजी बिहाणी आपल्या मनोगत म्हणाले की," विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जीवनातच शिस्त अंगी बाळगावी. वेळेच महत्व जाणून प्रत्येक क्षणाचा सद्उपयोग करावा. ज्या विद्यार्थ्यांकडे जिद्द , चिकाटी, आत्मविश्वास असतो. परिश्रम करण्याची ज्यांची तयारी असते. ते विद्यार्थी कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत असले तरी यशस्वी होतातच."
    पहिली ते दहावी या चार गटात संपन्न झालेल्या रंग भरन स्पर्धेत सेलूतील विविध शाळांतील ७५५ विद्यार्थी चिञकार सहभागी झाले होते. यात पहिल्या गटात स्नेहल इंगोले, कृतिका कान्हेकर, अदिना ताज या विद्यार्थीनींनी, दुसऱ्या गटात माधवी मगर, वैदेही कुलकर्णी, ईशांत कटारे या विद्यार्थ्यांनी, तिसय्रा गटात विजयश्री गाडेकर, साक्षी राउत, नंदिनी लाड या विद्यार्थीनींनी तर चौथ्या गटात यश जाधव, पार्थ वडकर, रविकुमार आसाराम या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त केले. या चिमुकल्या चिञकारांचे कौतूक प्रशस्तीपञ, सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी  यांनी केले. बक्षिस पाञ विद्यार्थ्यांच्या यादीचे वाचन फुलसिंग गावित आणि सुधीर जोशी यांनी केले. सुञसंचालन सुरेश हिवाळे यांनी तर आभार प्रदर्शन चिञकला विभाग प्रमुख किशोर कटारे यांनी केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें