- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 दिसंबर 2017

मानवत येथे आंबेडकरी संघटनेच्या वतीने  अंनतकुमार हेंगडे यांचा जाहिर निषेध .

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.२८:  मानवत  तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीच्या संघटने तर्फे शहरातील आठवडी बाजार इंडिया बँकेच्या समोर सर्वानी एकञीत येऊन केंद्रीय राज्यमंञी अंनतकुमार हेंगडे यांच्या विरोधात निषेधार्थ घोषणा देत तहसिल कार्यालय येथे तहसिलदार आश्विनी जाधव यांना  सर्व आंबेडकरी संघटने च्या वतिने निवेदन देण्यात आले.
या निवेदनात असे नुमद केले कि दि. २६ डिसेंबर रोजी भाजपा चे केंद्रीय राज्यमंञी अंनतकुमार हेंगडे यांनी आम्ही राज्य घटना बदलण्यासाठी सत्तेवर आलो हे वक्तव्य केले .हा भारतीय सविधानाचा व भारतीय राज्य ग्रंथाचा अवमान आहे .
या वक्तव्याचा निषेधार्थ तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळी संघटने तर्फे तहासिलदार मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले व निषेध नोदविण्यात आला.या निवेदनावर आशोक पंडित , संपत पंडित ,चंद्रकांत मगर ,नगरसेवक अंनद भदर्गे , नगरसेवक राजकुमार खरात, विजय खरात , रवि पंडित , व आंबेडकर वादी विद्यार्थ्यी युवामंच सर्व विद्यार्थ्यी व सर्व ग्रूप यांच्या स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें