- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 दिसंबर 2017

जमिनीच्या फेरच्या निकालावर स्थिगितीदेण्यासाठी स्वीकारली लाच ;सिल्लोड उप विभागीय अधिकाऱ्यासह लघुलेखक एसीबीच्या जाळ्यात.(अजय बाेराडे)

. कुळाच्या जमीनीवर खोट्या सह्या करून, जमिनीवर तहसीलदारामार्फत फेर मंजूर आदेशास स्थिगिती देण्यासाठी दहा हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सिल्लोड येथील उपविभागीय अधिकाऱ्यास व लघुलेखकास लाललूचपत विभागाने रंगेहात पकडत अटक केल्याची घटना गुरुवारी (दि. २८) दुपारी घडली. अनिल गोविंदराव माचेवाड( ४२. रा. साई रेसिडेंसी, इटखेडा ) व रत्नाकर साखरे (अलका सोसायटी, एन ९, सिडको ) असे उपविभागीय अधिकारी व लघुलेखक अधिकाऱ्याचे नाव आहे.
याविषयी पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी माहिती दिली कि, फिर्यादी यांची
चांदापूर (ता.सिल्लोड) शिवारातील गट क्रमांक 58, सर्व्हे नंबर 45 मधील तक्रार फेर क्रमांक 1033 व 1034 बाबत वर्ष 2014 च्या प्रकरणामध्ये 11 फेब्रूवारी 2016 रोजी तहसिलदारांनी दिलेल्या फेर आदेशास स्थगिती देण्यासाठी वरील फेरक्रमांक नामंजूर करण्यासाठी शेख ताहेर शेख महेबूब व इतर यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अपील अर्ज दाखल केला होता. अर्जदाराचा मुलगा अॅड.उस्मान शेख ताहेर यांनी दिलेल्या माहितीनूसार तहसिलदारांच्या फेर करण्याच्या आदेशास स्थगिती देण्यासाठी उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती. परंतू तक्रारदार लाच देण्याच्या मनस्थितीत नसल्याने तक्रारदाराच्या मुलगा शेख उस्मान यांनी याप्रकरणी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. तक्रारीच्या अनूशंगाने लाचलूचपत प्रतिबंधक पथकाच्या उपअधिक्षक वर्षाराणी पाटील व त्यांचे सहकाऱ्यांनी गुरूवारी दुपारच्या सुमारास उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये सापळा रचून लाचेची दहा हजार रूपयांची रक्कम स्विका..

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें