- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 दिसंबर 2017

मानवतरोड रेल्वेस्टेशन येथे ए.टि.एम.मशीन बसविण्याची मागणी.

मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.३० : मानवत शहरापासुन ७ किलो मीटरच्या आंतरावर असलेले मानवतरोड रेल्वेस्टेशन येथे ए.टि.एम.मशीन बसविण्याची मागणी जोर धरत आसुन लवकर लवकर ए.टि.एम.मशीन बसविण्यात यावी अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
कैशलेस व्यवहार हा सरकारचा नारा आहे ते मान्य पण सोनपेठ,पाथरी ,मानवत या तीन मुख्य तालुक्याच्या नागरिकांना मानवतरोड  रेल्वे स्टेशन हे एकमेव रेल्वे प्रवास करण्याचे ठिकाण आहे यामुळे मोठ्याप्रमाणात सामान्य प्रवासी तसेच नोकरदार या मार्गाने रोज प्रवास करत असतात पण मानवतरोड येथे  ए.टि.एम.मशीन नसल्यामुळे नागरिकांना याचा फार ञास होताना दिसत आहे.तसेच बाहेरून येनारे प्रवासी व  स्थानिक लोकाना याचा मोठा ञास होत आहे त्याच बरोबर मानवतरोड रेल्वेस्टेशन परिसरात खेडे पाडि बऱ्यांच प्रमाणात आहे व तेथेही ए.टि.एम.मशीन नसल्यामुळे केवळ बॅक मधुन पैसे काढण्यासाठी मानवत शहर गाठावे लागत आहे.यासाठी प्रशासनाकडुन लवकरात लवकर ए.टि.एम.मशीन मानवतरोड येथे स्थापन करुन रेल्वे प्रवासी सह नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी प्रवासी सह नागरिकातुन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें