जागतीक ग्राहक दिना निमित्त मार्गदर्शन.
◆तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या वतिने आयोजन.समशेर खान.
सेलु(प्रतिनिधि) :ग्राहकामध्ये जनजागृती निर्माण व्हावी तसेच ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकारी यांच्यासंबधी जागतीक ग्राहक दिनाचे औचित्य साधुन मार्गदर्शन करण्यात आले. जागतिक दिनानिमित्त परभणी जिल्ह्यात ग्राहक जागृती सप्ताह चे आयोजन करण्यात आले असुन त्यानुसार सेलु येथील गणेश नगर येथे शनिवार 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे जिल्हाध्यक्ष डाँ. विलास मोरे व तालुका सचिव शिवाजी आकात, अश्विनी घोगरे यांची उपस्थिति होती. ग्राहक जागृती सप्ताह निमित्त मार्गदर्शन करतांना डाँ. मोरे म्हणाले की, प्रत्येक नागरीकांना, आपले हक्क व अधिकार यांची माहीती असली पाहीजे प्रत्येक नागरिक हा ग्राहक आहे. त्यांच्या समस्या भरपुर आहेत. ग्राहकांनी जागरुक राहुन आपण खरेदी करत असलेल्या वस्तु यांची शहनिशा करुनच खरेदी केल्या पाहीजेत सध्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर लुट करण्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक ग्राहकांनी जागरुक राहिले पाहिजे. तसेच शासनाच्या विविध योजना आहेत त्या प्रत्येकाला मिळत नाहीत त्या प्रत्येकाला मिळाल्या पाहिजेत असेही बोलतांना डाँ. मोरे म्हणाले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरीक व महिला यांची उपस्थिती होती.तर या ग्राहक जागृती सप्ताहाची सांगता 28 डिसेंबर रोजी नुतन महाविद्यालयात ग्राहक जागृती कार्यक्रमाने होणार आहे.
पुर्ण....
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें