- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 29 दिसंबर 2017

*जिल्हा परिषद प्रा. शाळा रायपूर येथील विद्यार्थ्यांनी लुटला शैक्षणिक सहलीचा आनंद*

दिनांक २३/१२/२०१७ ते दि.२६/१२/२०१७ या चार दिवसाच्या कालावधीत जि.प.प्राथमिक शाळा,रायपूर ता.सेलू जि.परभणीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन केले होते.या सहलीत रांजणगाव गणपती, छत्रपती संभाजी महाराज यांचे समाधीस्थळ असणारे तुळापूर, भीमा कोरेगाव, आळंदी,देहू,पुण्यातील शनिवार वाडा, लाल महाल,दगडूशेठ गणपती, कात्रजचे प्राणिसंग्रहालय, नारायणपूर येथील बालाजी,वाईचा गणपती, प्रतापगड, महाबळेश्वर, तसेच भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार येथे भेटी देऊन विद्यार्थ्यांनी सर्वप्रकारची शैक्षणिक, भौगोलिक, ऐतिहासिक व धार्मिक माहितीचे बारकाईने निरीक्षण करून आनंद घेतला.या सहलीत शाळेतील वर्ग५ते ८चे ४२ विद्यार्थी सहभागी झाले होते.सहलीचे आयोजन व नियोजनाची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक श्री.कैलास सोळंके सर,श्री.गजानन शितळे सर,श्री.विठ्ठल भिसे सर,श्री.माधव गव्हाणे सर यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें