चिमुकल्या स्वप्नांना कल्पनेचे पंख द्या
- ञ्यंबक वडसकर
वालूर : तालूक्यातील केमापूर जिल्हा परिषद प्रशालेत लेखक आपल्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत ( शुक्रवार ता. २९ रोजी )नाट्यलेखक ञ्यंबक वडसकर यांनी भेट दिली. या वेळी कवी सुरेश हिवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक शरद ठाकर हे होते.
ञ्यंबक वडसकर आपल्या मनोगतात म्हणाले की, " विद्यार्थ्यांनी आपल्या चिमुकल्या पंखांना कल्पनेचे पंख देऊन भविष्याच्या उंच आकाशात गरूड झेप घ्यावी. ज्याप्रमाणे छन्नी हातोड्याच्या घावाने दगडातून मुर्ती साकार होते त्याप्रमाणेच अभ्यास आणि परिश्राच्यासाह्याने विद्यार्थ्यांनी आपला जीवन विकास करावा. मैदानावरील खेळासोबत कोणती तरी एक कला आत्मसात करून आपल्या व्यक्तिमत्वाला तेजस्वी करावे. पुस्तकांशी दोस्ती करुन आपली जीवन दृष्टी व्यापक करावी." यावेळी ञ्यंबक वडसकर यांनी ''श्यामची आई' पुस्तकातील एक नाट्यांश सादर केला. सोबतच कथा सांगितली. 'काट्या कुट्याचा तुडवीत रस्ता' ही इंद्रजीत भालेराव यांची कविता गाऊन दाखवली. विद्यार्थ्यांचे मनोरंजन आणि उद् बोधन करताता विद्यार्थी जीवनातील कर्तव्य त्यांनी सहज सांगितली. सुरेश हिवाळे यांनी त्यांची 'भुतदया' ही कविता सादर करून विद्यार्थ्यांत पाखरांसोबतच मानवसेवेचे संस्कार रूजवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दगडोबा माघाडे यांनी केले. सुञसंचालन ज्ञानेश्वर इघारे यांनी तर आभार प्रदर्शन प्रणिता गाडे यांनी केले.
शुक्रवार, 29 दिसंबर 2017
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें