- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 18 दिसंबर 2017

*गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतावर वडोद पोलीसांची धाड*

    एक शेतकरी गजाआड तर एक फरार !

Ajay Borade
वडोद बाजार ( प्रतिनिधी )
 वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत कायगाव  व जिवरग टाकळी ता सिल्लोड शिवारात शेतावर गांजा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर वडोद पोलीसांनी छापा मारून १७ किलो हिरव्या ताज्या गांजाच्या झाडास शेतकऱ्यासह ताब्यात घेतले असून एक शेतकरी पसार झाला आहे 
वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीत असणाऱ्या व सिल्लोड तालुक्यातील शेतावर गांज्या पिकाची लागवड करून गांज्या विक्री होत असल्याची माहिती खबऱ्या मार्फत वडोद पोलीसांना लागली सदर गांज्याची लागवड कुठेतरी असावी अशी शंका पोलीसांना आल्यानंतर पोलीसांनी गुप्त शोध घेतला असता कायगाव ता सिल्लोड येथे गट नं 124 मध्ये गांज्याची लागवड केल्याची मिळून आली अरोपी सखाराम गयबु फुके वय ५५ २ा जिवरग टाकळी ता सिल्लोड हा अरोपी मात्र फरार झाला त्याच वेळी टाकळी जिवरग शिवारात गट नं 236 /183  मध्ये अरोपी गणपत गोविंदा फुके वय ५२ यांच्या शेतावर गांजाची झाडे मिळून आले त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे पर्यवेक्षक पोलीस उपअधिक्षक नयना आलुडकर यांच्या फिर्यादीवरून वडोद पोलीसात आमली पदार्थ प्रतिबंधक कायदया अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे      उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आमले व स पो निरिक्षक अर्चना पाटील याच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही ठिकाणी पोलीसांनी एकाच वेळी धाड घातली हे विशेष या कार्यवाहीत पो.कॉ. जनार्दन राटोड, पो.ना दिलीप साळवे, भोलेनाथ राटोड, पो.कॉ तेनसिंग राटोड गणेश सोनवणे, नितीण उणे, योगेश घुगे, या पोलीस  पथकानी ही कामगिरी बजावली पुढील तपात एपीआय अर्चना पाटील या करत आहे 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें