हजारो हेक्टर कापुस पिकांचे कृषी विभाग करणार पंचनामे,
*आहवाल वरीष्ठांना पाठवणार*
*हजारो हेक्टर कापुस पिके वाया*
*बरंजळा येथे झाले पंचनामे*
शेख सलिम
भोलरदन.प्रतिनिधी.
तालुक्यातील बोंडअळी मुळे हजारो हेक्टर कापुसक्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन कृषी विभागाच्या वतीने दिरंगाई होत असल्याचे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सांगितले होते तसेच बोंडअळी मुळे यंदा बळीराजा फार संकटातून निघत असल्यामुळे हातावर आलेले पिके डोळ्या समोर वाया गेले आहे तालुक्यात हजारो हेक्टर कापुस पिके बोंडअळीच्या विळख्यात सापडलेले आहे तरी याची कृषीविभागाने अध्यापही दखल घेतलेली नसुन शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे त्याच बरोबर जर कृषी विभागाने लवकरात लवकर बोंडअळीचे पंचनामे केले नाही तर शक्तिप्रदर्शन करण्याचा इशारा दिला होता विषेश म्हणजे काही कृषी सेवकांची मनमानी कारभारामुळे अनेक शेतकऱ्यांना बोंडअळीचे फार्म भरता आले नाही तर अशा कामचुकार कर्मचाऱ्यांची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्याची मागणी सुध्दा जोरधरत आहे खरेतर बोंडअळीने शेतकर्यांच्या कंबरडे मोडले आहे दरम्यान तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील पवनपुत्र सेवाभावी संस्थेच्या वतीने तालुका कृषिअधिकारी यांच्याकडे कपाशिवर पडलेल्या बोंडअळीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्या नसता बरंजळा लोखंडे फाटीवर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला होता तर कृषिअधिकारी श्री व्यवहारे आणि त्यांचे सहकारी यांनी बरंजळा लोखंडे येथे शेतात येऊन पंचनामे करण्यास सुरुवात केली.तसेच शेतकऱ्यांना बोडअळीवर मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका कृषिअधिकारी व्यवहारे,कृषिसहायक पाबळे,शेतकरी अनिल भुतेकर,नारायण लोखंडे,बालाजी लोखंडे,स्वप्निल लोखंडे,केशव खांडवे,अमोल खांडवे,संजय लोखंडे आदी शेतकरी उपस्थित होते दरम्यान तालुक्यातील अनेक भागात कापुस पिकावर बोंडअळीने हल्ला चढविला असुन याचे पंचनामे करून आहवाल पाठविण्यात येणार असल्याचे कृषी अधिकारी श्री.व्यवहारे यांनी सांगितले आहे
प्रतिक्रिया-
कृषी विभागाने कापसवरील गुलाबी बोन्डअळीमूळे झालेल्या नुकसानाची दखल जरी घेतली असली तरी ,शेतकऱ्यांना न्याय मिळवुन देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे ,त्याच प्रमाणे बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यावर ही वेळ आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात अशी वेळ येऊ नये यासाठी बियाण्यांमध्ये बदल करणे आवश्यक आहे की नाही याची शहानिशा करून योग्य तो निर्णय कृषी विभागाने घ्यायला हवा आणी अशा कंपनी विरोधात गुन्हे दाखल करण्यात यावे.
अनिल भुतेकर -शेतकरी बरंजळा लोखंडे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें