- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 दिसंबर 2017

भोकरदन तालुक्यातील कुंभारी गाव गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात,

*विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान*
  *महावितरण कंपनीने दुर्लक्ष*
शेख सलिम
भोकरदन.प्रतिनिधी
तालुक्यातील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुंभारी गाव गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात सापडत असले तरी येथील महावितरण कंपनीच्या वतीने मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र मुस्लिम प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष इसरार खान यांनी केला आहे रात्रीच्या वेळी विध्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे एकी कडे शासन शिक्षणावर अधिक जोर देत असली तरी दिवस भर शाळेत आणी रात्री अभ्यास करण्यासाठी अख्खे गाव अंधारात असलेतरी या विषय कोणालाही परवा नसल्याचे इसरार खान यांनी सांगितले आहे विषेश म्हणजे येथील ग्रामपंचायत नागरीकांना सोई सुविधा पुरविण्यात कमी पडत आहे एकी कडे पुर्ण गाव अंधारात गावात विविध जातीचे डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्यामुळे याचा गंभीर परिणाम लहान वयोगटातील मुलांना सोसावा लागत असल्याचे पण बोलले जात आहे या पुर्वी कुंभारी गाव गेल्या अनेक महिन्यांपासून अंधारात सापडत होते त्या वेळी सुद्धा गावा कडे दुर्लक्ष करण्यात आले होते कशीबशी रोहित बसविण्यात आली पण ते टिकली नसुन परत खराब झाली तर या विषय संबधीत असलेल्या महावितरण कंपनीला कडवुन सुद्धा या गंभीर प्रकाराकडे मुद्दाम कानाडोळा करीत असल्याचा आरोप केला आहे मोहत्वाचे म्हणजे नेमके महावितरण कंपनीने घोडे कुठे अडले हेच देखील कळत नाही एकीकडे अख्खे गाव अंधारात आणी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी उजेडात कारण कुंभारी हे गाव शहरापासुन जवळ असुन सुद्धा या कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्यामुळे गावकऱ्यांनी विज वितरण कंपनी विरोधात रोष व्यक्त केला आहे या गंभीर प्रकाराकडे संबधीत असलेल्या महावितरण कंपनीने तातडीने दखल घेतली नाही तर महावितरण कंपनी विरोधात कुंभारी फाट्या वर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र मुस्लिम प्रतिष्ठानचे जालना जिल्हा अध्यक्ष इसरार खान दरबार खान यांनी दिला आहे आता पाहने हे आहे की महावितरण ताबडतोब रोहित्र बनविणार की रास्ता रोको आंदोलन होणार हे विषेश आहे

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें