✒ *दिवसभरातल्या*
*हेडलाईन्सवर एक नजर*
दि.13/12/2017
_____________________________________
⭐ गुजरातमध्ये भाजप हरणार, एबीपी-सीएसडीएस आकडेवारीच्या आधारे योगेंद्र यादवांचा अंदाज, भाजपपेक्षा काँग्रेसला 10 ते 20 जागा अधिक मिळण्याचं भाकित...
⭐नाशिक-मुंबई हवाई सेवेला 23 डिसेंबरपासून सुरुवात, उद्यापासून बुकिंग, दोन-तीन दिवसात वेळापत्रक जाहीर होणार; तर 24 डिसेंबरपासून मुंबई-कोल्हापूर विमानसेवाही सुरु, आठवड्यातून 3 दिवस विमान झेपावणार...
⭐ अहमदनगर : पारनेर तालुक्यातील कोहकडी येथे कुकडी नदीपात्रात बेकायदा वाळूविरोधात कारवाई केल्याच्या रागातून तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न...
⭐ कोल्हापूर :गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून 500 उठाबशांची शिक्षा, कोल्हापुरातल्या कानूर गावातील धक्कादायक प्रकार, विद्यार्थीनीला उभं राहणंही कठीण...
⭐ राहुल गांधींच्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना बजावली नोटीस...
⭐ पिंपरी :लग्नाच्या काही तासांपूर्वी वधूची गळफास घेऊन आत्महत्या, पिंपरीतील धक्कादायक प्रकार...
⭐ पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सात जागांचा होणार ऑनलाइन लिलाव. शुक्रवारपासून नोंदणी प्रक्रियेला सुरुवात, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रत्यक्ष लिलाव...
⭐ मराठी भाषेला अभिजात दर्जा देऊन सकस लेखन करणाऱ्यांना संमेलनात स्थान द्या. अन्यथा, बडोदा येथील नियोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उधळून लावू, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विरोधी कृती समितीचा इशारा...
⭐ नागपूर हिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित केला असता सत्ताधाऱ्यांच्या पोटात दुखंत - धनंजय मुंडे यांचा आरोप...
⭐ मुंबई : जोगेश्वरीच्या बालविकास विद्यामंदिर शाळेतील २८ मुलांना खिचडीतून विषबाधा...
⭐ भिवंडी : काल्हेर येथे जिल्हा परिषद निवडणुकीत दोन गटात हाणामारी, शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले...
⭐ गडचिरोली : लग्नाचं वचन देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गडचिरोलीत भाजप नेत्याला अटक, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल...
⭐ अहमदनगर : बाजार समितीकडे केलेली तक्रार मागे घेण्यासाठी व्यापाऱ्याकडून पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय अध्यक्ष अण्णासाहेब सांवत व शशिकांत कान्हेरे यांच्याविरोधात जामखेडला गुन्हा दाखल...
⭐ पुणे :पुण्यात सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाची सूरमयी सुरुवात, पुढील पाच दिवस पुणेकरांना शास्त्रीय संगीताची मेजवानी...
⭐ अहमदनगर : आजारपणाला कंटाळून ७५ वर्षीय वृद्ध महिलेची पेटवून घेऊन आत्महत्या, नेवासा तालुक्यातील माका गावातील घटना...
⭐ क-हाड : येथील शासकीय व्यवसाय महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या स्वच्छतागृहात मुलांनी चोरून कॅमेरा लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस...
⭐ लातूर : नरेंद्र हडियाल पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरण - पोलीस उपनिरीक्षक सुधाकर बावकर यांची बदली, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड यांनी दिले बदलीचे आदेश...
⭐ सोलापूर : पंढरपुरला दर्शनासाठी निघालेल्या कर्नाटकातील भाविकांच्या गाडीला अपघात, 11 जण जखमी...
⭐ गेल्या सरकारमध्ये सत्ताधाऱ्यांनी बँकांवर दबाव आणून काही जणांना कर्ज देण्यास भाग पाडले त्यावेळी फिक्कीसारख्या संस्थांनी बघ्याची भूमिका का घेतली, फिक्कीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा सवाल...
⭐जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांपासून जोरदार बर्फवृष्टी, नियंत्रण रेषेजवळ पाच जवान बेपत्ता...
⭐मोहाली वन डेत कर्णधार रोहित शर्माचं श्रीलंकेविरुद्ध खणखणीत द्विशतक, बायकोला द्विशतकाचं अॅनिव्हर्सरी गिफ्ट, वन डेत तीन द्विशतकं ठोकणारा रोहित एकमेव क्रिकेटर....
⭐ मोहाली वनडेत भारताचा श्रीलंकेवर 141 धावांनी विजय; तीन सामन्याच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी...
⭐ दुबई आेपन बॅडमिंटन : पी.व्ही. सिंधूची विजयी सलामी, चीनच्या ही बिंगजीया ओ चे कडवे आव्हान २१-११, १६-२१, २१-१८असे परतावले...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
_____________________________________
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें