दुकाणास आग लागुन तीन लाखाचे साहीत्य जळून खाक
पाथरी तालूक्यातील खेर्डा येथील घटना
शे.अजहरपाथरी/प्रतिनिधी
तालुक्यातील खेर्डां येथिल एका किराणा दुकानाला आग लागून दुकानातील किराणा सामान फर्निचर , कापूस अदी साहीत्य भस्मसात होऊन जवळपास 3 लाख रुपयाचे नुकसान झाल्याची घटना शनिवार 30 डिसेंबर च्या पहाटे 4 च्या दरम्यान घडली असुन अडीच तासाच्या प्रयन्नानंतर आग अटोक्यात आणण्यास अग्नीशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.
पाथरी तालूक्यातील खेर्डा येथील माणिक किशनराव सिताफळे यांच्याकडे किराणा दुकान असुन दररोजच्या प्रमाणे शुक्रवार 29 डिसेंबर रोजी दिवसभ सुरु असलेले किराणा दुकान रात्री बंद करुन सिताफळे झोपले असता पहाटे चार च्या दरम्यान दुकाना स आग लागुन आगीचे लोट बाहेर पडत असल्याने सिताफळे यांच्या कुटुंबीयासह अजुबाजुचे ग्रामस्थांनी दुकानाकडे धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतू आगीने रौद्ररुप धारण केल्याने ग्रामस्थांनी पाथरी न प च्या अग्नीशामक दलास पाचारण करताच काही क्षणात गाडी येऊन यावरील अग्नीशामक दलाचे कर्मचारी , शारेफ खान , खुर्रम खान ,शेख शेरू यांनी अडीज तास प्रयत्न करुन आग अटोक्यात आनली आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळला अन्यथा आग पसरून अजुबाजुच्या घरांनी पेट घेऊन मोठी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही परंतू या आगीत दुकाना मधील किराणा सामान , फानिचर , दिड लाख रुपया पर्यतचा कापूस अदी साहीत्य भस्मसात होऊन यात दुकानदाराचे जवळपास 3 तीन लाखाचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची चर्चा आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें