- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 31 दिसंबर 2017

पांगरा गावची हागंदरी मुक्तीकडे होतेय वाटचाल
--------------------------------
पूर्णा/प्रतिनिधी
तालूक्यातील पांगरा लासीना गावात सध्या अनेक नागरीकांच्या घरी स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शौचालयाचे बांधकाम युध्दपातळीवर होत असून गावाची हागंदरी मुक्तीकडे वाटचाल होत आहे.येथे नव्याने निवडूण आलेल्या महिला सरपंच सौ गिरजाबाई महादूबुवा गिरी,उपसरपंच नामदेवराव ढोणे,विकासाचे माहेमेरू उत्तमराव ढोणे,राजू गिरी व गावातील असंख्य सुजान नागरीक आणि युवा पिढी यांच्या पुढाकारातून १२३ नागरीकांच्या घरी शौचालयाचे बांधकाम चालू आसून काही जणांचे काम पूर्ण झाले आहेत.या गावात एकूण जवळपास ४५० घराची संख्या आहे.ह्या पैकी या पूर्वि तत्कालीन सरपंच उत्तमराव ढोणे यांनी महाराष्ट्र यशवंत नळ व पाणी पुरवठा जि प परभणी योजनेतून मागासवर्गिय वस्तीत ९१ नागरीकांच्या घरी शौचालये बांधले आहेत.तसेच मराठवाडा वस्तीत ३७८ पैकी १२३ ठिकाणी शौचालय बांधकामे सध्या चालू आहेत.यानंतर ते पूर्ण झाल्यानंतर लगेचच उर्वरीतचे कामं चालू केल्या जाणार असून काही बांधकामे या आधी पूर्ण झालेले आहेत अशा नागरीकांना आनूदान देखील प्राप्त झाले आहे.एकंदरीत सर्वच शौचालयाची बांधकामे लवकरच पूर्ण होवून गाव १०० टक्के हागंदरी मुक्त होणार आहे.या कामी गावातील नागरीकात शौचालय बांधकाम विषयी जनजागृतीचे काम ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच,सदस्य व स्वच्छतेचा ध्यास घेतलेली टिम करीत आहे.याच बरोबर गावचा सर्वांगीण विकास हा विविध योजनेच्या निधीतून करण्याचा चंगच गावक-यांनी बांधल्याने पांगरा गाव परभणी जिल्ह्यात विकासाचे एक माँडेल म्हणून नावारूपाला येणार असल्याचे कळते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें