भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने सिल्लोड-सोयगाव तालुक्यासाठी ६६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 14 दिसंबर 2017

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने सिल्लोड-सोयगाव तालुक्यासाठी ६६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने सिल्लोड-सोयगाव तालुक्यासाठी  ६६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर

अमोल शेजुळ
सिल्लोड दि. १३ (प्रतिनधी)  सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील १२ गावासाठी अल्पसंख्याक विभागा मार्फत  ६६ लक्ष रुपयांचा  मंजूर करण्यात आला आहे हा  निधी कब्रस्थान संरक्षण भिंत, रस्ता, शादीखाना,  बांधकाम करण्यात येणार आहे,  यासाठी  खा. रावसाहेब दानवे यांनी अल्पसंख्याक विकास मंत्री विनोद तावडे यांच्या कडे केली होती, महाराष्ट्र सरकारने अल्पसंख्याक बहुल ग्रामीण भागाच्या गावासाठी सुमारे ३५  कोटी तर नागरी भागासाठी २५कोटी  रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली असुन त्या मंजूर केलेल्या तरतुदीनुसार खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून   सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील १२ गावासाठी ६६ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे अशी माहिती सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन इद्रीस मुलतानी यांनी दिली.
सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील खलील गावामध्ये होणार विकासकामे व निधी
मादणी  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  १०लक्ष
कायगाव  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ३लक्ष
गेवराई शेमी  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ३लक्ष
गव्हाली  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
कोटनांद्रा  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
देऊळगाव बाजार  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
चिंचवन  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
धामणी  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
निल्लोड  शदिखाना बांधकाम करणे  १०लक्ष
बहुलखेडा  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
तिखी   कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
आमखेडा  कब्रस्थान वाल कम्पाउंड व रस्ता  ५लक्ष
चौकट:-
भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून करोडो रुपयांचा निधी सिल्लोड सोयगाव तालुक्यासाठी मंजूर होत आहे पण जे मागील सरकारच्या काळात मंत्री होते त्यांनी त्यांच्या काळात तर काहीच केले नाही परंतु खा. दानवे यांनी मंजुर केलेल्या कामाचे उदघाटने  करण्याचे काम करतात,
:- इद्रीस मुलतानी चेअरमन सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना

Tezznews24 वेब वाहिनिला.सपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमने आहे.
संपर्क.8888375846 या नंबर वर आपले पासपोर्ट फोटो व बासोडेटा पाठवने. 

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें