इंदोर येथील राष्ट्रीय शालेय साँफ्टबॉल स्पर्धेसाठी नूतन महाविद्यालय चा निलेश माळवे ची निवड
सेलू ( समशेर खान )क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या वतीने राज्य शालेय साँफ्टबाँल स्पर्धेत 19 वर्ष मुले गटात नूतन महाविद्यालय सेलू च्या चि. निलेश गणेश माळवे यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून महाराष्ट्र राज्य साँफ्टबाँल संघात झाली आहे.
राष्ट्रीय शालेय साँफ्टबाँल स्पर्धा इंदोर( मध्येप्रदेश) येथे दि.24 ते 30 डिसें 2017 दरम्यान येथे संपन्न होणार असुन.
महाराष्ट्र राज्य संघाचे राष्ट्रीय स्पर्धा पुर्व प्रशिक्षण शिबीर जळगाव येथे दि .18 ते 23 डिसेंबर दरम्यान संपन्न होणार आहे.
निलेश यांनी आजपर्यंत तीन राज्य साँफ्टबाँल स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. राष्ट्रीय शालेय टेनिस व्हाँलीबाँल सुर्वण पदक प्राप्त केले.
सदर खेळाडूस प्रा.नागेश कान्हेकर,डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे, प्रा.के.के. कदम,सतिश नावाडे, प्रंशात नाईक, प्रा.प्रसेनजित बनसोडे ,यांचे मार्गदर्शन लाभले आहे
ह्या उज्वल यशा बदल नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम्. लोया उपाध्यक्ष अँड. वसंतराव खारकर चिटणीस डी.के.देशपांडे सहसचिव डॉ. व्ही. के.कोठेकर सहसचिव श्री .जयप्रकाशजी बिहाणी, जिल्हाक्रीडाधिकारी सी.व्ही. साखरे,प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, प्रा.यादव गायकवाड, राज्य सचिव डॉ. प्रदीप तळवलकर, पर्यवेक्षक एल.एच.काळे, प्रा. रंमाकांत बनसोडे,प्रा.दयानंद जामगे, प्रा.मोहन पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यानी अभिनंदन करून स्पर्धेस शुभेच्छा दिल्या.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें