- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 30 दिसंबर 2017

@शिक्षक व पालक यांच्यात समन्वय आवश्यक 

@जि.प.उपध्याक्षा भावना नखाते यांचे प्रतिपादन 

@न्यु हायस्कूल येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न 

सेलु:प्रतिनिधी 

विद्यार्थीच्या सर्वांगीण विकासाची जवाबदारी शिक्षक व पालक यांची आहे.म्हणून शिक्षक व पालक यांच्यात समन्वय आवश्यक आहे असे प्रतीपादन जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते यांनी केले .
         येथील मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ परभणी संचलीत न्यु हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात शनीवारी 30 डिसेंबर रोजी आयोजित शिक्षक पालक मेळाव्यात सौ.नखाते बोलत होत्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष भरतनाना बोराडे तर प्रमुख पाहूणे म्हणून दत्तात्रय माकोडे अॅड.गोविंद शेळके ह.भ.प.शिवाजी महाराज खवने प्रा.विठ्ठल डख आशा गायकवाड प्राचार्य आर.एल.वायसे पर्यवेक्षीका निता केवारे आदीची प्रमुख उपस्थिती होती 
                 यावेळी बोलताना सौ.भावनाताई नखाते म्हणाल्या की मुलांच्या शालेय जिवनात पालक हा खुप महत्वाचा घटक आहे पालकांनी आपल्या मुलांना कडे लक्ष द्यावे मुले घडण्यात शिक्षकांचे योगदान देखील तितकेच महत्वाचे आहे. भारतीय संस्कृतीत कर्माला महत्व आहे.चांगले काम करणार्याना नेहमी चांगले फळ मिळते म्हणून शिक्षकांनी मुलांना चांगले शिकविण्याचे कर्म करावे तसेच आजच्या  धावत्या युगात पालकांनकडे मुलासाठी वेळ नाही अशी खंत व्यक्त करत सौ.नखाते म्हणाल्या की दैनंदिन व्यस्त  जीवनात पालकांनी  पाल्यासाठी वेळ द्यावा पाल्य घरी आल्या नंतर अभ्यासा विषयी चौकशी करून गृहपाठ करून घ्यावा प्रत्येक पालकांना आपले मुल कर्तृत्वान व्हावे आसे वाटते त्यासाठी शिक्षक व पालकांनी पुढे आले पाहीजे शालेय जिवनात विद्यार्थीनी आपला वेळ अभ्यासासाठी देऊन मोठे ध्येय ठेवावे प्रंचड मेहनत करून गुनवत्ता सिद्ध करवी व  सक्षम बनावे असे मत सौ.भावनाताई अनिलराव नखाते यांनी व्यक्त केले यावेळी शिक्षक प्रतिनिधी म्हणून पर्यवेक्षीका निता केवारे प्रा.संतोष कुलकर्णी तर पालक प्रतिनिधी म्हणून हभप शिवाजी महाराज खवाने दत्तात्रय माकोडे भरतनाना बोराडे यांनी मनोगत व्यक्त केले .
        शेषराव नागरे व संच यांनी स्वागतगीत सादर केले .प्रास्ताविक प्राचार्य आर एल वायसे यांनी केले सुत्रसंचालन धनंजय भागवत यांनी केले .गणेश गुद्दे यांनी आभार मानले सामुहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले .

वयानुसार संस्कार करावे

प्रत्येक पालकांनी आपल्या पाल्या सोबत वयानुसार वागण्याचा सल्ला सुभाषीतकारांचा दृष्टांत देत ह भ प शिवाजी महाराज खवणे यांनी दिला  ते म्हणाले कि वयाच्या पाच वर्षापर्यंत पालकांनी पाल्याचे लाड पुरवावे पुढील दहा वर्ष ताडण करावे म्हणजे सगळे वागणे समजुन सांगावे मात्र पाल्यांनी सोळा वर्ष पुर्ण केल्यानंतर पालकांनी पाल्यासोबत मित्रासारखे वागण्याचा सल्ला त्यांनी दिला चांगले काम मुद्दाम करावे लागते परंतू वाईट काम सहज होते त्यामुळे शिक्षक व पालक यांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना आकार देण्याचे काम करावे आसे स्पष्ट केले

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें