क्रीडा शिक्षक सतिश नावाडे यांच्या वाढदिवसानिमित्त 40 हजार चे हाँकी साहित्य भेट.
सेलू : ( समशेर खान )येथे नूतन विद्यालय क्रीडा शिक्षक सतिश सदाशिवआप्पा नावाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नूतन विद्यालय क्रीडा विभागास हाँकी खेळाचा प्रसार प्रचार करण्यासाठी 40 हजार चे हाँकी साहित्य भेट देऊन क्रीडा क्षेत्रातील अनोखा उपक्रम केला.
या निमित्ताने नावाडे सरांचा सत्कार नूतन विद्यालयात पत्रकार रामराव सोनवणे ,प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे, उपमुख्याध्यापक अनिल कुलकर्णी, पर्यवेक्षक अशोक गाजरे, मा.मा.सुर्वे, क्रीडा,प्रा.दंडवते, के.पी. राठोड, विभाग डी.डी. सोन्नेकर, गणेश माळवे, प्रंशात नाईक,नंदकुमार बंगाळे,प्रा.नागेश कान्हेकर, खेळाडू उपस्थित होते.
नावाडे सर गेल्या 31 वर्षे पासून क्रीडा क्षेत्रात कार्यरत असुन त्यांचा खेळाडू ते मार्गदर्शक चा प्रवास क्रीडा क्षेत्रातील कार्या साठी उल्लेखनीय ठरला आहे. राष्ट्रीय स्तरावर व्हाँलीबाँल, टेनिस व्हाँलीबाँल खेळात अनेक पदक प्राप्त खेळाडू ना मार्गदर्शन लाभले.
नावाडे या प्रसंगी म्हणाले आपण क्रीडा क्षेत्रात कार्यरत असुन , राष्ट्रीय खेळ हाँकी खेळाचा प्रसार व्हावा, हाँकी खेळात भारतीय संघास उत्कृष्ट खेळाडू निर्माण व्हावे या धरतीवर प्राथमिक स्तरावर खेळाडू निर्माण व्हावे म्हणून मी हाँकी साहित्य प्रशालेस भेट देतो.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें