नळणी येथे सांस्कृतिक आई महोत्सव संपन्न
शे.सलिम
प्रतिनिधी.भोकरदन.
प्रतिनिधी.भोकरदन.
भोकरदन तालुक्यातील समर्थनगर नळणी येथे नुकताच सांस्कृतिक आई महोत्सव 2017 हा समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला.
दिनांक आठ रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे विश्व शाहीर परिषदेचे विभागीय अध्यक्ष शाहीर दिलीप पिंपळे हे होते. तर महोत्सवाचे आयोजक शाहीर गुलाबराव नळणीकर यांच्या सह सांस्कृतिक व समाज प्रबोधन कार उपस्थित होते.
याप्रसंगी तळेकर वाडी भोकरदन येथील महिला कलावंत संगीताबाई तळेकर, सुगंधाबाई वराडे , नर्मदा बाई पालोदे यांनी सामाजिक व सांस्कृतिक या विषयावर कलापथकाचा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी जवळपास तीस कलापथकांनी सहभाग नोंदविला.
सदरील कार्यक्रमास नळणी सह पंचक्रोशीतील नागरिकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें