- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 दिसंबर 2017

उत्कृष्ट शिक्षकांचा शनिवारी  जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मान

🔷जिल्हा परीषद शिक्षण विभागाचा उपक्रम

🔶गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठिवर मिळणार कौतुकाची थाप

परभणी (जिल्हाप्रतिनीधी )
              दिवंगत राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णंन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणुन साजरा केला जातो त्या अनुषंगाने जिल्हापरीषद शिक्षण विभागाच्या  वतीने शनीवारी ९रोजी  प्राथमिक ९ ,माध्यमिक १ व विशेष शिक्षक १ यांना उत्कृष्ट शिक्षक म्हणुन  जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात  येणार आहे व त्याचबरोबरच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते यांनी दिली .
                     येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरातील आश्वमेध सभागृहात ९डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील  जिल्हास्तरीय पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजीत केला आहे
          हा समारंभ जिल्हाधीकारी पी.शिव शंकर यांचे शुभहस्ते तर जि.प.अध्यक्षा सौ उज्वलाताई राठोड यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे प्रमुख उपस्थीती म्हणून मुख्यकार्यकारी अधिकारी प्रताप सवडे जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई नखाते, बांधकाम सभापती अशोकराव काकडे कृषी व पशुसंवर्धन सभापती श्रीनीवास मुंढे , समाजकल्याण सभापती सौ .उर्मीलाताई बनसोडे , महिला व बालकल्यान सभापती सौ. राधाबाई सुर्यवंशी ,डायट च्या प्राचार्या चंद्रकला ठोके , मुख्य लेखा व वित्त अधिकारी ज्योती भोंडे उपमुख्यकार्यकारी अधिकारी सर्वश्री एम.व्ही .करडखेलडकर ,साहेबराव देसाई ,विजय मुळीक ,सि.एम.ढोकणे यांची उपस्थीती राहणार आहे
     या वेळी सामाजीक ,शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट काम करणार्या ९ जिल्हा परीषद प्राथमिक शिक्षक ,१जिल्हा परीषद माध्यमिक शिक्षक , व १विशेष शिक्षकांना जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन गौरवीण्यात येणार आहे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे  या समारंभाचे संयोजन शिक्षणाधिकारी (प्रा )आशा गरूड ,शिक्षणाधिकारी(मा) बि.आर.कुंडगिर , शिक्षणाधिकारी (निरंतर) एस .एम चौधरी व सर्व उपशिक्षणाधीकारी ,गटशिक्षणाधीकारी करीत आहेत

🛑असे आहेत  जिल्हास्तरीय पुरस्काराचे मानकरी
              
           प्राथमिक संवर्गामधुन

1)व्यंकटराव मनोहरराव जाधव (जि.प.प्रा.शा.ईठलापुर ता .परभणी ) ,
2)विष्णुपंत लक्ष्मणराव परडे (जि.प.प्रा.शा.खांबेगाव ता .पुर्णा ) ,
3)प्रकाश बाबुराव डुब्बे (जि.प.प्रा .शा.भोगांव ता .जिंतूर ) ,
4)तुकाराम नागोजी मुंढे (जि.प.प्रा.शा.पोखर्णी वाळके ता.गंगाखेड) ,
5)शंभुदेव गुलाबराव कुंडगीर (जि.प.प्रा .शा.मुदखेड ता.पालम )
6)सदाशिव माणिकराव धापसे (जि.प.प्रा.शा.तिवठाणा ता.सोनपेठ) ,
7)दिगंबर बाबाराव
लगड (जि.प.कन्या शाळा वालूर ता.सेलू)
8) कान्हु सुंदरराव लहिरे (जि.प.प्रा.शा.रामपुरी बु  ता.मानवत )
9)रूक्मीण गंगाराम जाधव (जि.प.प्रा.शा.बाबुलतार ता.पाथरी )
                     माध्यमिक शिक्षक संवर्गमधून
1)शोभा चंद्रकांतराव राजूरकर (जि.प.प्रशाला एरंडेश्वर ता.पुर्णा )
                         विशेष शिक्षक संवर्गमधुन
1)मारोती टोपा चव्हाण (जि.प.प्रशाला पाथरी ता.पाथरी )
या शिक्षकांचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारामध्ये सामावेश आहे.शाल ,श्रीफळ,स्मृतीचिन्ह ,व सपत्नीक सत्कार असे पुरस्काराचे स्वरूप आहे .

🛑दोन शिक्षकांना विशेष प्रोत्साहन  पुरस्कार
                     प्राथमिक शिक्षक संवर्गामधुन दोन शिक्षकांना विशेष प्रोत्साहन पुरस्कार दिला जाणार आहे त्या मध्ये
1) सतिश एकनाथराव कांबळे (जि.प.प्रा.शा.सातेगांव ता.पालम ) ,
2)माधव नामदेवराव सोनवणे (जि.प.प्रा.शा.धर्मापुरी ता.परभणी ) यांचा सामावेश आहे .

🛑 तांत्रीक अडचणीमुळे पुरस्कार वितरण समारंभास तिन महिने विलंब .....सौ भावनाताई नखाते
                          जिल्हास्तरीय निवड समितीने शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील उत्कृष्ट जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी जिल्हा परीषद प्राथमिक व माध्यमिक शिक्षक व विशेष शिक्षकाची   निवड केली होती .परंतू या दरम्यान ग्रामपंचायत  निवडणुक अचारसंहिता आसल्या कारणाने या पुरस्कार निवडीस शासनाकडून मान्यता मिळण्यास वेळ लागला त्यामुळे हा पुरस्कार समारंभ दिवंगत राष्ट्रपती डॉ  सर्वपल्ली राधाकृष्णंन यांच्या जन्मदीनी म्हणजे  ५ सप्टेंबर २०१७ शिक्षक दिनी घेता येणे शक्य झाले नाही .तिन महिने विलंब झाला असला तरी   शिक्षण विभागाने शिक्षकांना सन्मानपुर्वक पुरस्कार वितरण  समारंभाचे नियोजन केले आहे आशी माहीती जि.प.उपाध्यक्षा तथा शिक्षण सभापती सौ भावनाताई अनिलराव नखाते यांनी दिली

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें