*विनाअनुदानित तत्वावर कार्य करणाऱ्या शिक्षकांनी नागपूरच्या आंदोलनात सहभागी व्हावे*
मौ.सिराजोद्दीन नदवी.
जिंतूर.प्रतिनिधी.
महाराष्ट्र राज्यातील विविध विनाअनुदानित खाजगी उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयात मागील सतरा वर्षांपासून विनाअनुदानित तत्वावर कार्य करणाऱ्या शिक्षकांना न्याय हक्क प्राप्त करून देण्यासाठी राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ माध्यमिक विद्यालय शाळा कृती समितीचे जिल्हाध्यक्ष सोनुने सर, उबाळे सर, पडघन सर, जाधव सर यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा ओलांडून जिल्हाभर भेटी देऊन शासन दरबारी शिक्षकांच्या समस्या मांडल्या मात्र विनाअनुदानित महाविद्यालयात कार्य करणाऱ्या शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांकडे शासन दुर्लक्षच करीत असल्याने खाजगी विनाअनुदानित उच्च माध्यमिक महाविद्यालयावर कर्तव्य बजावणाऱ्या शिक्षकांच्या ज्वलंत समस्यांवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी संबंध महाराष्ट्रातील शिक्षक व कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथील विधान भवनात 11 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या मोर्चात परभणी जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंदोलन यशस्वी करावे ही विनंती.
🌼 *विनीत*🌼
*मौलाना सिराजोद्दीन नदवी*
*अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष*
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें