सुरभि महोत्सवाचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन
समशेर खान.
सेलू :- येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सव 2017 चा उद्घाटन समारंभचा कार्यक्रम (ता.17) वार रविवार रोजी विद्याविहार संकुल येथे पार पडला.
या महोत्सवाचे उद्घाटन स्काऊट आणि गाईड विभागाचे जिल्हा मुख्य आयुक्त संतोष बोबडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डाॅ.संजय रोडगे, प्रमुख पाहुणे म्हणुन उपविभागीय अधिकारी रेणुका वागळे, डाॅ. रामराव रोडगे, संस्थेच्या सचिव डाॅ.सविता रोडगे, नगरसेवक अजीम कादरी, माजी नगरसेवक मिलींद सावंत, बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश ढगे, जेष्ठ पत्रकार विलास मोरे, इसाक पटेल, शिवाजी सातपुते, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, सर्व घटक संस्थेचे प्राचार्य आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिष्ठानच्या ध्वजारोहण व द्विप प्रज्वलनाने झाली व प्रतिष्ठान गीत अदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाच्या विद्यार्थीनी गायिले.
उद्घाटाक संतोष बोबडे बोलतांना म्हणाले की, क्रीडवर विद्यार्थ्यांचे आरोग्य अवलंबुन असते. त्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवणात खेळा बद्दल आवड निर्माण करा. जेणेकरुन विद्यार्थ्याचे आरोग्य सुधारेल. व शाळेमध्ये विविध खेळांच्या प्रशिक्षण दिले पाहिजे त्यामुळे खेळाची माहिती मिळेल.

विद्यार्थ्यांनी प्रत्येक खेळ हा जिद्दीने खेळला पाहिजे व त्यामध्ये अव्वल येणाचे ध्येय उराशी बाळगले पाहिजे. नाविण्य पुर्ण प्रात्यक्षिकाचे सादरीकरण नेहमीच सुरभि महोत्सवाप्रसंगी या ठिकाणी पहावयास मिळते तसेच सुरभि महोत्सवास शुभेच्छा रेणुका वागळे यांनी दिल्या.यासह मिलीद सावंत, धनंजय सर यांनी आपली मनोगत व्यक्त केली
अध्यक्षीय समारोपामध्ये डाॅ.संजय रोडगे म्हणाले की, आज 17 वा सुरभि महोत्सवाचे आयोजण यशस्वीपणे सेलुवासीयासाठी व शाळेतील पालकांसाठी करण्यात य़ेते. सुरभि महोत्सवाचा हेतु एवढाच की, शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामधील कलागुणाणा वाव मिळविण्यसाठी महोत्सवाचे आयोजण करण्यात येते. त्याचबरोबर सॅनरो प्रोडक्शनच्या वीतीने *अवनी एक संघर्ष*या नविन मराठी चित्रपटाविषयी माहिती आपल्या मनोगतामध्ये सांगितली
सुरभि महोत्सव उद्घाटन दिनी क्रीडादिनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मार्चपास, ड्रील, बाबु ड्रील, लेझीम, स्टंट, एकात्मिक अदिवासी प्रकल्प च्या विद्यार्थ्याचे कराटे प्रात्यक्षिक अँरोबिक डान्स, आदी क्रीडा प्रकाराचे सादरीकरण शालेय विद्यार्थ्यांनी केले. प्रिन्स अकँडमीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज पराक्रम गाथा, शेतकरी जीवणावरील सत्य परिस्थितीचे दर्शन या ठिकाणी अपुर्वा पालीटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी दाखविली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मेरिना अवसंगी तर आभार कृष्णा सापनार यांनी मानले
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मेरिना अवसंगी तर आभार कृष्णा सापनार यांनी मानले
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें