- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 दिसंबर 2017

पिपंळगाव पेठ येथे दारुबंदिसाठी महिलांचा एल्गार.

पिंपळगाव पेठ येथे दारू बंदीसाठी महिलांचे पोलीस उपनिरीक्षक सरीता गाडे यांना निवेदन.

/प्रतिनिधी.अजय बाेराडे
सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव पेठ येथील महिलांनी दारू
विक्री व पत्ता खेळणे बंद करणे बाबत सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशन च्या
पोलीस उपनिरीक्षक श्रीमती. सरिता गाडे यांना निवेदन देण्यात आले.
पिंपळगाव पेठ येथे अनेक दिवसापासुन अवैधरित्या दारू विक्री केली जाते.
दारू विक्रेत्यांचा सुळसुळाट झाला असुन त्यामुळे गावातील महिला, तरुणी,
शाळकरी मुले त्यांना अवैध दारू विक्रेत्यांचा व पिणारांच्या त्रासाला
सामोरे जावे लागत आहे. सदरील अवैध दारू विक्रेत्यांना बऱ्याचदा दारू
विक्री बंद करण्याबाबत विनंती केली तरी सबंधित लोकजुमानत नाही. उलट पक्षी
बंद करणाऱ्या महिला मंडळीस दमदाटी करतात. आमचे दारू विकणे पोलीस देखील
बंद करू  शकत    नाही असे दम देतात. बऱ्याचदा पोलिसांनी कार्यवाही केली
परंतु   त्याला न जुमानता सर्रास पणे दारू विक्री केली जाते. या दारू पाई
गावातील अनेक तरून दारूच्या व पत्त्याच्या व्यसनाकडे वळून त्यांचे संसार
उद्ध्वस्थ होण्याची भिती निर्माण झालेली आहे.
त्याच प्रमाणे अवैधरित्या गुटखा विक्री व  पत्ते खेळणार्यांचा  देखील
सुळसुळाट झालेला आहे.    त्यामुळे गावातील नवतरुण पत्ते खेळणार्यांकडे
खेचला जात आहे. यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागत आहे. या निवेदनाची
योग्य दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महिला
ग्रामस्तानी निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी सरपंच दुर्गाबाई सांगळे,
उपसरपंच नईम मिर्झा, पो कॉ शिंदे, पोलीस पाटील साईनाथ कळम, आन्ना बदर,
देविदास सांगळे, सखाराम भागवत, परमेश्वर फुले, रंजणाबाई भागवत, गेन्दाबाई
जाधव, मथुराबाई गुंजाळ, संगीताबाई दिवटे, सुनिता बेलेवार,
रुख्मनबाई लोणकर, कमलबाई बेलेवार, पुष्पाबाई भोसले, रेखाबाई बेलेवार,
नंदाबाई आम्ले, सुलोचनाबाई सांगळे, विमलबाई तायडे, ठगनाबाई फुले, मीनाबाई
बेलेवार, छायाबाई बेलेवार, पुष्पा बेलेवार, अलकाबाई सांगळे, मनकर्णा
सांगळे. गयाबाई भोसले,लक्ष्मीबाई चिनके, आदी महिलांच्या निवेदनावर सह्या
केल्या आहे.
पिंपळगाव पेठ येथे दारू बंदीसाठी महिलाे पोलीस उपनिरीक्षक सरीता गाडे याना निवेदन देताना.छाय.अजय बाेराडे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें