“परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा घोटाळा उघडकीस “
+++विधिमंडळ पक्षनेते श्री अजित पवार, आ.जयंत पाटील व आ.विजय भांबळे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीस सहकार व पणन राज्यमंत्री श्री गुलाबराव पाटील यांचे उत्तर.
मौलाना सिराजोद्दीन नदवी.
प्रतिनिधी.जिंतुर.
जिंतूर – दि.१९/१२/२०१७ रोजी विधिमंडळ पक्षनेते श्री अजित पवार, आ.जयंत पाटील व आ.विजय भांबळे यांनी विधान भवन नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी येथील झालेल्या घोटाळ्या प्रश्नी लक्षवेधी दाखल केली होती.
सदर लक्षवेधी हि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वालूर येथील सलंग्न असलेल्या कार्यकारी सोसायटी मध्ये साधारणतः एक वर्षापूर्वी झालेल्या घोटाळ्या संदर्भात होती. सदर लक्षवेधी मध्ये सन २०१५ – १६ सोसायटीच्या ६१ सभासदांचा विमा मंजूर झालेला होता. त्या ६१ सभासदांपैकी २८ सभासदांच्या नावे बँकेतील कर्मचाऱ्यानि कर्जाचे बोगस डिमांड केले त्याच्या खात्यावर कर्जाची रक्कम जमा करून बोगस स्वाक्षऱ्या कागदपत्रे दाखवून परस्पर पैसे उचलले या प्रकरणी साधारणतः १ वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी तक्रार केली होती. परंतु, सदर ताक्रेची कुठलीही दखल बँकेचे अध्यक्ष, संचालक, मंडळाचे सदस्य व बँकेचे महाव्यस्थापक यानी घेतली नाही त्या अनुषंगाने स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आ.विजय भांबळे यांनी जिल्हाधिकारी परभणी व जिल्हा उपनिबंधक परभणी यांचेकडे तक्रार केली असता लेखा परीक्षक यांनी सदर प्रकरणी कर्मचारी दोषी असल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधक परभणी यांचेकडे दाखल केला. त्याअनुषंगाने जिल्हा उपनिबंधक परभणी यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी यांचे महाव्यवस्थापक यांना प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. परंतु, बँकेचे अध्यक्ष,संचालक, मंडळाचे सदस्य व महाव्यवस्थापक यांनी या प्रकरणी थातूर मातुर कार्यवाही करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असल्या बाबतची लक्षवेधी आज विधानभवन नागपूर येथे विधानसभा सभागृहात उपस्थित झाली. या लक्षवेधीला उत्तर देताना सहकार व पणन राज्यमंत्री श्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले कि,
सदर प्रकरणी दोन कर्मचारी यांच्यावर विलंबनाची कार्यवाही केली व या प्रकरणी कार्यवाहीस विलंब का लागला ? याची चौकशी करू.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा वालूर येथे ५ कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करणे, बोगस कागदपत्रे दाखवणे परस्पर पैसे उचलणे या मुळे त्यांच्यावर कलम ४२० व ४६९ प्रमाणे गुन्हे दाखल करणार असल्याचे उत्तर दिले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक परभणी अंतर्गत अनेक शाखांमध्ये अश्या प्रकारचे गैरव्यवहार झालेले आहेत. झालेल्या गैर व्यवहाराची फिरत्या पत्रकाद्वारे चौकशी करून दोषींवर महाराष्ट्र सहकारी संस्था सहकार कायदा १९६० कलम ८३ अंतर्गत पोटकलम ३ (अ), (ब) नुसार कारवाई करणार असल्याचे उत्तर श्री गुलाबराव पाटील सहकार व पणन राज्यमंत्री यांनी दिले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें