- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 दिसंबर 2017

आमदार वारिस पठाण यांचं राज ठाकरे यांना आव्हान

मूंबई : एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी राज ठाकरेंना आव्हान दिलं आहे, वारिस पठाण यांनी म्हटलं आहे, 'हिंमत असेल, तर भायखळ्यात येऊन तोडफोड करा, मग तुम्हाला दाखवतो'.

*मनसेच्या वादात वाचाळ वारीस पठाण यांची उडी*
ईद-ए-मिलाद निमित्त सोलापुरात आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना आमदार पठाण मनसेवर घसरले, आणि भायखळ्यात तोडफोड करून दाखवा, आम्ही जशास तसे उत्तर देऊ, म्हणून ते आमच्या भागात येत नाहीत, असंही वारीस पठाण यांनी यावेळी सांगितलं.

*'राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा' - वारिस पठाण*
तसेच मनसे अध्यक्ष 'राज ठाकरे म्हणजे विझलेला दिवा' असल्याची टीका, एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी केली आहे. मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांवरुन मनसे आणि संजय निरूपम यांच्यात वाद सुरु आहे, या वादात आता एमआयएमच्या वारीस पठाण यांनी उडी घेतली आहे.

*म्हणून ते आमच्या भागात येत नाहीत*

मनसेची तोडफोड म्हणजे राजकीय अस्तित्व जपण्यासाठी सुरु असलेली धडपड आहे, असं यावेळी वारीस पठाण यांनी म्हटलं आहे. मनसेने जर भायखळ्यात तोडफोड केली, तर आम्ही त्याला जशाच तसे उत्तर देऊ,  जशाच तसे उत्तर देण्याची आमची तयारी आहे, म्हणून ते आमच्या भागात येत नाहीत, असं वारिस पठाण यांनी म्हटलं आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें