वर्गमित्रांनी पुस्तके भेट देऊन केला मैत्रीणीचा वाढदिवस साजरा
तालुक्यातील अन्य शाळेतही राबविला जातो असा उपक्रम
सोनपेठ (राजेश खेडकर) शहर व परिसरात मागील कांही वर्षांपासुन वाढदिवस पुस्तके भेट देऊन साजरा करण्याचा उपक्रम राबविल्या जात आहे. प्राथमिक शाळा असो महाविद्यालय प्रत्येक ठिकाणी हे पहावयास मिळते. यात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, प्राध्यापक येवढेच काय संस्था चालक व व्यापारी सुद्धा या उपक्रमास ग्रंथदान करून हातभार लावत आहेत. यामुळे अनेक शाळा आता ग्रंथ संपन्न झाल्या असुन शालेय विद्यार्थ्यांना यामुळे वाचनाची आवडही निर्माण झाली आहे.
अशाचप्रकारचा आगळावेगळा वाढदिवस आज येथील श्री महालिंगेश्वर विद्यालयात ईयत्ता पाचवीच्या वर्गात साजरा झाला आहे. ज्याचा वाढदिवस आहे ती व्यक्ती आपल्या मित्र मैत्रिनिंना काहीतरी भेट देत असतात, मात्र श्री महालिंगेश्वर विद्यालयाची ईयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु.अनुष्का महेश खेडकर हीच्या वाढदिवसा निमित्त तीच्या वर्ग मैत्रीणी कु.पायल सुरवसे, दुर्गा मस्के, प्रगती प्रधान, अंजली पंचांगे, रेश्मा चव्हाण व कोमल आदींनी कु.अनुष्कास वाढदिवसाची भेट म्हणुन थोर विचारवंत व समाजसेवकांचे चरित्र असलेली पुस्तके भेट दिली. एकिकडे पालकच मुलं अवांतर पुस्तकं वाचत नसल्याचे सांगतात, तर ईथे मात्र मित्र मैत्रिनीच्या वाढदिवसा निमित्त पुस्तके भेट देणारी शाळकरी मुलं सुद्धा पहावयास मिळत आहेत हे वाचन संस्कृतीत वाढ होण्यास पुरक असे वातावरण निर्माण होत असल्याचे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक जोशी यांनी व्यक्त करून सर्वांनीच आपापल्या वाढदिवसी पुस्तकेच भेट म्हणुन देण्याचे आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
यावेळी वर्गशिक्षक बंडू आदोडे, सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे सदस्य सतिश भंडारे, विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती मोठ्याप्रमाणात होती. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभारप्रदर्शन सहशिक्षक नामदेव निळे यांनी केले.

धन्यवाद अन्वर पठाण सर.
जवाब देंहटाएंसोनपेठ ग्रंथ वाचन चळवळ आपले आभारी आहे.