सिल्लोड येथील उपविभागीय अधिकारी ए.सि.बीच्या जाळ्यात.
सिल्लोड:(अजय बोराडे) अपिलावर लवकर सुनावणी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथील उपविभागीय अधिकारी आणि त्यांचा स्टेनो या दोघांना पकडण्यात आले. औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सिल्लोड येथे गुरुवारी दुपारी ही कारवाई केली.
उपविभागीय अधिकारी अनिल माचेवाड आणि स्टेनो साखरे अशी पकडलेल्यांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या उपअधीक्षक वर्षाराणी पाटील यांच्या पथकाने हा छापा मारला.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें