- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 28 दिसंबर 2017

ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन ही काळाची गरज- डाॅ. विलास मोरे

सेलू :-  जागृत ग्राहक, तत्पर संघटना, प्रामाणिक दुकानदार व गतीमान प्रशासन यांनी ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी तत्परता दाखवून ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन केल्यास समाज समर्पित अशा जागृत ग्राहक निर्मीतीसाठी वेळ लागणार नाही असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे यांनी केले.
जागतिक ग्राहक दिनानिमीत्त ग्राहक प्रबोधनासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत, तहसिल कार्यालय व नुतन महाविद्यालय सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी ता. 28 डिसेंबर रोजी नुतन महाविद्यालयाच्या सभागृहातील आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तहसीलदार स्वरूप कंकाळ, यावेळी प्राचार्य डाँ. शरद कुलकर्णी, तहसीलदार स्वरूप कंकाळ, अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त कृष्णा जयपुरकर, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष डाॅ. विलास मोरे, वजनमापे विभागाचे जिल्हा निरीक्षक प्रकाश केजकर, तालुका निरीक्षक सुदाम करपे, नायब तहसीलदार तुकाराम सुगंधे, तालुकाध्यक्ष पंकज निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. डाॅ. मोरे यांनी आपल्या मानोगतात माहितीच्या अधिकाराबाबत ज्या प्रकारे जनजागृती होऊन त्याचा वापर मोठया प्रमाणावर होतांना दिसून येतो त्याचप्रमाणे ग्राहक संरक्षण कायद्याचे प्रबोधन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगीतले. तसेच ग्राहकांच्या न्याय व हक्कासाठी जनजागृती करण्यासाठी शासकीय यंत्रणा तत्पर असून यात ग्राहकांचा सहभागही महत्वाचा आहे. ग्राहक संरक्षण कायदा २४ डिसेंबर, १९८६ साली पारित झाला असून ग्राहकांना न्याय देण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंचाची स्थापनाही प्रत्येक जिल्ह्यात झाली आहे. मात्र अपुर्ण माहिती व शिक्षणाचा अभावामुळे ग्राहक याचा उपयोग करतांना दिसून येत नाही याची खंत वाटते. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त कृष्णा जयपुरकर यांनी अन्न पदार्थ व औषधी मध्ये कशाप्रकारे भेसळी करण्यात येत आहेत व त्यांची रितसर लेखी स्वरुपात तक्रार करण्याच्या सुचना केल्या तर वैध्यमापनशास्त्र निरिक्षक सुदाम करने यांनी वजन मापे कसे प्रमाणित असावेत व ग्राहकांनी प्रमाणित केलेल्या वजनानुसारच खरेदी करण्याचे अवाहन केले यावेळी तहसीलदार स्वरुप कंकाळ म्हणाले की, प्रत्येक वस्तु खरेदी करतांना ग्राहकांनी कटाक्षाने, राहत ती खरेदी करावी जेणे करुन आपण संबधित वस्तु संबधित तक्रार करु शकतो खरेदीची रितसर पक्की पावती घ्यावी असे ही बोलतांना कंकाळ म्हणाले कार्यक्रमाचे प्रस्ताविक पंकज निकम यांनी केले.सुत्रसंचलन सुरेश हिवाळे तर अभार शिवाजी आकात यांनी मानले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी, नागरीकांची उपस्थिति होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अश्विनी घोगरे, सुंदर पौळ, रवि भदर्गे, तसेच तहसिल कार्यालयातील पोटफोडे, भिसे, जईद सह महाविद्यालयीन कार्मचारी यांनी पुढाकार घेतला.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें