- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 8 दिसंबर 2017

राजस्थान येथे लव जेहाद च्या नावाखाली झालेल्या हत्येचा मानवत युवकाकडुन निषेध .
मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०८: राजस्थान प्रातातील राजसमन येथे लव जेहाद च्या संशयावरुन नुक्तेच  झालेल्या मुस्लीम युवकाची हत्या प्रकरणी मानवत येथील युवकानी निषेध नोदवत आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन आज दि.८ डिसेबर रोजी नायब तहसिलदार शेख वसीम यानां देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राजस्थान प्रातातील राजसमन येथे लव जेहाद च्या संशयावरुन एका मुस्लीम युवकाची लाईव्ह व्हिडिओ बनवुन हत्या करण्यात आली यातील आरोपिना फाशीची शिक्षा देण्यात यावी व अशा प्रकारच्या घटना भविष्यात होणार नाही याची दक्षता घ्यावी.या अशा घटनामुळे अल्पसंख्याक समाज हा दहशतीत वावरत आहे व यामुळे अल्पसंख्याक समाजात असुरक्षेची भावना मनात निर्माण होत असल्यामुळे आरोपिना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन तहसिल कार्यालय येथे देण्यात आले.निवेदनावर
टीपू सुल्तान युवा मंचचे तालुका अध्यक्ष सय्यद समीर ,अज़हर खान,शेख शफी बापू ,तनवीर सर, वसीम कुरैशी, बाबा बागवान,शेख मजीद टेलर ,शेख मुजीब,महबूब पिंजरी,शेख अज़ीम ,शेख मजीद,शेख मुजीब आदी युवकांच्या स्वाक्षरी आहेत. यावेळी मोठ्याप्रमाणात युवक उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें