“जिंतूर नगरपरिषद पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या परवीन तहजिब जानेमिया ७९६ मतांनी विजयी"
मौलाना सिराजोद्दीन नदवी.प्रतिनिधी.जिंतूर.
जिंतूर येथील वार्ड क्र.८ मध्ये एक जागा रिक्त झाल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. एकूण १८४१ मतांपैकी राष्ट्रवादीच्या 'परवीन तहजिब जानेमिया' यांनी १२५१ मते घेत विरोधी उमेदवाराचा तब्बल ७९६ मतांनी पराभव केला.
माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पाठींबा दिलेल्या उमेदवार जकिया बेगम अब्दुल मुकील यांना फक्त ७३ मते पडल्याने त्यांचे डीपाँजीट जप्त झाले आहे. आणि परत एकदा आ.विजय भांबळे यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे.
गतवर्षी नगरपरिषदेची सत्तापालट करत जनतेने राष्ट्रवादीला कौल दिला. त्यानंतर होत असलेल्या विकासकामांच्यामुळे जनतेने आज पुन्हा एकदा राष्ट्रवादीवर विश्वास दाखवला त्याबद्दल आमदार विजय भांबळे यांनी मतदार बंधू-भगिनींचे आभार व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें