- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 13 दिसंबर 2017

....दिनांक 11 डिसेंबर बेमुदत बंद....

शे.अज़हर.

प्रतिनिधी.पाथरी.
पाथरी तालुका कायम विना अनुदानित शिक्षक कृती समिती च्या वतीने पाथरी मध्ये सर्व कमवि आणि उमावि शाळा बंद ठेवून बेमुदत बंद ला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. बेमुदत बंद मध्ये सामील झालेल्या महाविद्यालयामध्ये महात्मा बसवेश्वर कमवि देवनांद्रा/गुंज, सरस्वती बाई भाले पाटील कमवि लोणी, खान अब्दुल गफार खान कमवि पाथरी, संस्कार कमवि पाथरी, जी. एम. वस्तानवी उर्दू कमवि पाथरी, शरदचंद्र पवार उर्दू विज्ञान कमवि पाथरी, शंकरराव चव्हाण कमवि पाथरी, शांताबाई नखाते उमावि पाथरी या महाविद्यालयाचा समावेश होता. तसेच कायम विना अनुदानित शिक्षक कृती समितीने पुकारलेल्या बेमुदत बंद ला अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांनी सुद्धा जाहीर पाठींबा दिला. बेमुदत बंद ला एक दिवसाकरिता जाहीर पाठींबा देणाऱ्या अनुदानित उमावि मध्ये नेताजी सुभाष चंद्र उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी, उच्च माध्यमिक विद्यालय देवनांद्रा यांचा समावेश होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें