- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 4 दिसंबर 2017

*शेख महेमुद यांचा सत्कार*

अलिम पठान.
ताडबोरगांव : ( प्रतिनिधि )

   ताडबोरगांव ता. मानवत येथील राजीव गांधी हायस्कूल मधील विद्यार्थि प्रिय सहशिक्षक शेख महेमुद अमिनोद्दिन यांना त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल बोधी ट्रि एज्युकेशन फाउँडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबाद तर्फे प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय " जीवन गौरव " पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ताडबोरगांवचे सरपंच सचिन पठाडे पाटिल, उपसरपंच पठाण उमर खॉ यांच्या हस्ते शाल व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
      या वेळी ग्रामपंचा़यत सदस्य सर्वश्री रतन पठाडे पाटिल, शिवाजी गुंगाणे, रियाज भाई, जिल्हा परीषद प्रशाला व्यवस्थापन समिती मराठी माध्यमाचे अध्यक्ष विठ्ठलराव गुंगाणे, ऊर्दु माध्यमाचे अध्यक्ष मुनिर पटेल, प्रतिष्ठित नागरीक अलिम पटेल, सय्यद फारुख अदि उपस्थित होते.
      शेख महेमुद यांना दि. ७ जानेवारी २०१८ रविवार रोजी विभागिय आयुक्त मा. पुरुषोत्तमजी भापकर साहेबांच्या हस्ते महसुल कर्मचारी प्रशिक्षण प्रबोधनी सभागृह, औरंगाबाद येथे सपत्नीक जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें