✒ *दिवसभरातल्या*
*हेडलाईन्सवर एक नजर*
➖➖➖➖➖➖➖➖
✍🏻 संकलन :- *विकास नाईक*
_____________________________________
💢 मुंबई : ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे दीर्घ आजाराने निधन, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास...
💢 मुंबई : उद्या मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शाळा बंद ठेवणार; ओखी चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने घेतला निर्णय...
💢 कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, रायगड जिल्ह्यात 4 ते 5 बोटी बुडाल्या, मुंबईतही सतर्कतेचा इशारा...
💢 मुंबई : 15 दिवसात 50 कोटी रुपये जमा करा, प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णींना कोर्टाचा आदेश, 19 डिसेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा...
💢 जम्मू-काश्मीर : काजीकुंडमध्ये दहशतवाद्याशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाचा जवान शहीद, तर एक जखमी. चकमकीत दोन दहशतवादी ठार...
💢 दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ घोषित... पार्थिव पटेल आणि हार्दिक पंड्याचे पुनरागमन...
💢 सिंधुदुर्ग : मालवणात ओखीचा हाहाकार, पोलिसांच्या गस्ती नौकेला जलसमाधी, पाच नौका भरकटल्या, गुजरातमधील शेकडो नौका आश्रयाला देवगडात...
💢 मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी...
💢 नितीन आगे हत्या प्रकरणाची 2016 च्या सुधारित अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सुनावणी व्हावी, माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांची मागणी, 1 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा...
💢 अमरावती : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य अधिवेशन व शिक्षण परिषद 26 ते 30 डिसेंबर दरम्यान सिंधुदुर्गमधील ओरोस येथे आयोजित केले आहे. शिक्षणाचे खासगीकरण थांबवा, प्राथमिक शाळेतच सर्व शैक्षणिक सुविधा द्या, हा या अधिवेशनाचा उद्देश आहे...
💢 अहमदनगर : जमिनीच्या वाटपाच्या वादातून सख्या भावाचा खून केल्याप्रकरणी भाऊ व भावजई अशा दोघांना जन्मठेप. कुशाबा दुधवडे आणि सोनबाई दुधवडे या दोघांना झाली शिक्षा...
💢 अकोला : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना अटक...
💢 औरंगाबाद : औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाचा ओंगळवाणं प्रदर्शन, वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात धांगडधिंगा, ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर डान्स आणि पैशांची उधळपट्टी...
💢 अधिकाऱ्यांना संपत्तीचा तपशील देण्याची गरज नाही, कायद्यातील दुरुस्तीमुळे मोदींनी लोकपाल कायदा कमकुवत केला, अण्णा हजारेंचा आरोप...
💢 १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोट : दोषी मोहम्मद ताहीर मर्चंट याच्या फाशीच्या शिक्षेला सुप्रिम कोर्टाची स्थगिती...
💢 नाशिक : आयटीआय येथे ‘आयसीटीएसएम’ व्यावसायिक परीक्षेतील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान; मनविसेचं आयटीआय उपसंचालकांच्या दालनात ठिय्या आंदोलन, परीक्षा ओएमआर पद्धतीनं पुन्हा विनामूल्य घेण्याची मागणी...
💢 रत्नागिरी : लाचखोर प्रकरणी अटक केलेल्या कोषागार कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला ४ वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड; २०१४ मध्ये पकडले होते रंगेहाथ...
💢 गुजरात निवडणुक: सुरतमध्ये रॅली काढू नये म्हणून 5 कोटी रुपयांची ऑफर, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा दावा...
💢 काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड जवळपास निश्चित, इतर कुणाचाही अर्ज नाही, राहुल गांधींच्या समर्थनार्थ 890 प्रस्ताव, उद्या औपचारिक घोषणा...
💢 औरंगजेब राजवटीसाठी काँग्रेसला शुभेच्छा, काँग्रेसच्या घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात...
💢 मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेसाठी रोहित शर्माकडे भारतीय संघाचे नेतृत्व...
💢 मॅथ्यूज पाठोपाठ श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलचंही शतक साजरं, भारताविरोधातील दिल्ली कसोटीत श्रीलंकेला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यात यश...
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
✍ *संकलन :- विकास नाईक* ♈
_____________________________________
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें