- Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 19 दिसंबर 2017


“बोंड आळीमुळे झालेल्या कापूस पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी आ.विजय भांबळे यानी शासकीय विश्राम गृह जिंतूर येथे अधिकाऱ्यांची घेतली बैठक.”

मौलाना सिराजोद्दीन नदवी.
प्रतिनिधी.जिंतूर.
जिंतूर – बोंड आळीमुळे झालेल्या कापूस पिकांचे नुकसान भरपाई देण्यासाठी जिंतूर-सेलू तालुक्यातील दोन्ही तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी तळाठी, यांची एकत्रित बैठक  दि.१८/१२/२०१७ रोजी दु.१.०० वा. शासकीय विश्रामगृह जिंतूर येथे आ.विजय भांबळे यांनी घेतली. यावेळी बैठकीमध्ये आ.विजय भांबळे यांनी कर्मचार्यांना सांगतिले कि, पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरपाई देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांनी ७-१२ वर कापूस पिकांचा पेरा लावलेला नाही, परंतु, त्यांनी कापूस पिक घेतलेले आहे. त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात यावी. एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहता कामा नये. असे स्पष्ट बैठकीत सांगण्यात आले.
      पिक पाहणी करून पंचनामे तत्काळ शासनाकडे पाठवून लवकरात लवकर शेतकऱ्यांना आर्थिक मदत कसी देता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आ.विजय भांबळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सांगितले.
          

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें