मानवत नगरपरिषदच्या नवीन घंटागाडी व ट्रकटरचे उदघाटन.
[] विजयकुमार कञुवार यांची स्वच्छता दुत म्हणुन नगरपरिषद कडुन निवड []
मानवत / मुस्तखीम बेलदारदि.१९: मानवत नगरपरिषद येथे स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत स्वच्छ शहर सुंदर शहर बनविने या दृष्टिकोनातून शासनाने स्वच्छतेबाबत दिलेल्या निर्देशानुसार त्याचे काटेकोरपणे पालन करुन शहरात ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा गोळा करने त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावने अशा योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी नगरपरिषद मानवतच्या वतीने ४ नवीन घंटागाडी व १ ट्रकटर ट्रालीसह खरेदी करण्यात आले होते.या नवीन घंटागाडी व ट्रकटरचे उदघाटन दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता नगरपरिषद कार्यालय पोलीस कवार्टर रोड जुनी तहसिल येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन विजयकुमार बापुराव कञुवार ,प्रमुख पाहुणे म्हणुन जयकुमार काला,सुरेशसेठ काबरा,दत्तप्रसाद बांगड,संजयकुमारजी लड्डा,युवानेते डॉ.अंकुश लाड,नगराध्यक्षा शिवकन्या स्वामी तसेच नगरपरिषदचे सदस्य मोहन लाड,विनोद राहाटे,जमील चाउस,बालाजी कुर्हाडे,अकबर अन्सारी ,रुषिकेश बारहाते,गोपाल गौड ,बालाजी गोलाईत,प्रकाश पोरवाल,रहिम भाई बागवान ,राजु खरात,किरण बारहाते बाबा हालणोर व मानवत शहरातील प्रतिष्ठित नागरीकाच्या उपस्थीतीमध्ये उदघाटन समारोह पार पडला.यावेळी विजयकुमार कञुवार यांची स्वच्छता दुत म्हणुन नगरपरिषद मानवत कडुन निवड करण्यात आली.या वेळी विजयकुमार कञुवार यांनी स्वच्छतेबाबत उपस्थीततांना मार्गदर्शन केले.मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी स्वच्छतेबाबत महत्व कळवुन दिले व अनेक धाडसी निर्णय घेतल्या बद्दल डॉ.अंकुश लाड व नगर सेवक यांचे यावेळी कौतुक केले,की ज्यांनी वरील साहित्य खरेदित साठी महत्त्वपुर्ण निर्णय घेतला.मानवत नगरपरिषदेकडे २ ट्रकटर व ९ घंटागाडी साहित्य आसल्यामुळे मानवत शहर हे जिल्हयातील क्रमांक १ चे शहर होईल असा विश्वास मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला.यावेळी डॉ.अंकुश लाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शहरातील नागरिक व सर्व नगरपरिषद सदस्यांना आवाहन केले की सर्वानी मिळुन शहर कसे स्वच्छ होईल व स्वच्छतेत जिल्हयात प्रथम येण्यासाठी प्रयत्न करावेत असे ते म्हणाले.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें