प्रतिनिधी.वा
लुर.दि.16/07/2023
रायपुर ता.सेलु जि.परभणी येथील वृद्ध शेतकरी महेमुदखॉ उस्मानखॉ पठाण यांना जाणुन बुजुन कुसुम सोलार योजनेमुळे वंचित ठेवण्याचे काम माडा कर्मचारी यांनी केले असल्याने दि.14 अगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे सह कुटुंब उपोषणाचा इशारा एका निवेदनाद्वारे दि.14/07/23 रोजी दिला आहे.
महाकृषी ऊर्जा अभियान कुसुम योजनेअंतर्गत राज्यातील कृषी पंप विज जोडण्याचे सौर ऊर्जद्वारे विद्युतीकरण प्रधानमंत्री कुसुम -ब योजना 90 ते 95% अनुदानाची .. पर्यावरणपूरक हरित क्रांतीची योजनेसाठी गरजुना अर्ज करण्याचे आवाहन करत असताना परभणी जिल्ह्यात या योजनेत चिरीमीरी घेऊन अर्ज मंजुर करण्याचे काम अधिकारी व कर्मचारी मंडळी करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
संबंधित प्रकरण असे कि त्यांची स्वतःची जमिन रायपुर शिवारात असुन ज्याचे गट नं.40 असे असुन त्यांच्या नावावर कोनताहि विद्युत कोटिशन नाही व विहिरीला मुबलक पाणी साठा असताना विद्युत पुरवठा नसल्याने त्यांनी रितसर महाकृषी अभियान (कुसुम सोलार) योजनेचा अर्ज दाखल केला होता परंतु महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण (महाऊर्जा) जिल्हा कार्यालय परभणी येथील तपासनीस कर्मचारी यांनी कोणतेहि शासकिय शिकष नसताना जाणुन बुजुन त्यांचे अर्ज बाद केल्याने त्यांचा शेती पिकांचा नुकसान झाल्याने वृद्ध शेतकरी यांनी जिल्हा कार्यालयात वारंवार चकरा मारुन ते हताश झाल्याने त्यांनी एका अर्जाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालया समोर सहकुटुंब उपोषणाचा इशारा दिला आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें