जिंतुर प्रतिनिधी
जिंतूर शहरातील बामणी प्लॉट येथिल मेराज सिद्दीकी सर यांच्या 6 वर्षीय अलिज़ा सिद्दीकी या चिमुकलीने पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून दि 15/04/2022 शुक्रवारी रोजी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा पूर्ण केला आहे.
रमजान महिन्यातील रोजाला मुस्लीम बांधवांमध्ये अनन्य साधारण महत्व असुन या महिन्यात मुस्लीम बांधव सलग 30 दिवस रोजा ठेवून विविध धार्मिक विधींद्वारे अल्हाची पूर्ण श्रद्धेने आराधना करतात आणि याच महिन्यात चिमुकले ही आपल्या जीवनातील रोजाची सुरुवात करतात. याचीच प्रचिती म्हणून 6 वर्षीय अलिज़ा सिद्दीकी या चिमुकलीने तपत्या उन्हाची पर्वा न करता आपल्या आयुष्याचा पहिला रोजा यशस्वीपणे पूर्ण केला आहे.म्हणून अलिज़ा सिद्दीकी वडील मेराज सिद्दीकी सर,आजोबा मुख्तारोद्दीन सिद्दीकी फिरोज सिद्दीकी बदरोद्दीन काझी सलाउद्दीन चाचा मुज्जु सिद्दीकी यांनी त्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें