संपादक,अनवर पठान दि.21/01/2022.
सेलु तालुक्यातील दुधना नदि पात्रात रेती माफियाकडुन अवैध रेती उपसा रात्र अन् दिवस जोरात चालु असुन संबधीत नदितील राजेवाडि,राजा,डुगरा, ब्राह्मणगाव येथील जप्त रेती साठा अंदाजित चार शे ब्रासचा लिलाव महसुल विभाग सेलुने केलेला आहे परंतु वाळु तस्करी करणारे याचा फायदा उचलुन नदि पात्रातील वाळु दिवसा ढवळे चोरटि वाहतुक करताना दिसत आहे व तस्करी करुन आनलेली रेती परिसरातील लोकांना पाच ते सहा हज़ार ट्रेक्टर ट्रॉली व टिप्पर 40 ते 50 हज़ार प्रमाने विकत विकताना दिसत आहे हि अवैध उपसा केलेली रेती जिंतुर मानवत पाथरी व इ.तालुक्यात हि जात आहे. या प्रकरणी महसुल प्रशासनाने अवैध रेती तस्करावर कडक कार्यवाहि कार्यवाहि करणार सेलु व वालुर परीसरातील वाळु माफियांना नेमके अभय कुणाचे ?…अवैध वाळूचोरी कारवाई थंडबस्त्यात,प्रशासनाला लाखो रुपयाचा चुना,वाळु माफियांना कारवाईची भिती नाही…कुठल्याही महसुल अधीकाऱ्यांची व पोलीस अधीकाऱ्यांची वचक नसल्यामुळे होत आहे या परीसरात दिवसा अवैध वाळु तस्करी वाळू वाहतुक करतानां अनेक विनानंबर प्लेटच्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे.यात ट्रॅक्टर,टिप्पर यासह अन्य वाहनांचा समावेश होत आहे.त्यामुळे वाळु तस्करांचे चांगभल होत आहे.वाळु तस्कर राञीचा दिवस करून नदि पात्रात ट्राक्टरने व टिप्परमध्ये जेसीबीच्या सहाय्याने रेतीऊपसा करीत आहेत मेन रोड मार्गावरुन रेतीची अवैध वाहतुक केली जात आहे.मात्र अपवाद वगळता ठोस कारवाई होतांना दिसत नाही कित्येकदा प्रकरण दाबल्याचेही प्रकार अधुन मधुन घडत असल्याची माहिती खाञीलायक सूत्रांनी दिली आहे.
कार्यवाहि बघून मार्ग बदलुन रेतीची वाहने ही वेळीच लोकेशन सांगुन वळविली जातात त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून अवैध गौणखनिज प्रकरणी ठोस कारवाई होने गरजेचे आहे.या कडे जिल्हा खनिकर्म अधीकारी व जिल्हाधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
तेज़्ज़न्युज़24 वेब चेनल संपादक अनवर पठान , मो.नं.8888375846
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें