अंबड(शेख फारुख)-अंबड तालुक्यातील पारनेर ते रवनापराडा रस्त्याची गेल्या अनेक दिवसांपासून अक्षरशः लागली वाट या अठरा किलोमीटर डांबरीकरण रस्त्याचे काम होऊन दोन ते तीन वर्षांचा कालावधीही झाला नसुन की रस्त्यावर जागोजागी मोठं मोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागातंर्गत निकृष्ट दर्जाचे झाल्यानें हा रस्ता खराब होत असल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे या रस्त्याने चार चाकी.दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते या रस्त्याचे बारा वाजले आहे या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले आहेत तर काही ठिकाणी रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते म्हणण्याची वेळ आली आहे या रस्त्यावर वाहन चालवितांना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यामार्गे नौकरी करनारे व्यावसायिक.मजुर शेतकरी.विध्यार्थी.येथून ये-जा करतात रस्त्याची दुरवस्था ही नागरिकांसाठी डोके दुखी ठरली असुन दैनंदिन प्रवासात कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे या रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी सामान्य जनतेतुन होत आहे
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें