जुलमी कायदा UAPA रद्द करा रद्द करा, भीमा कोरेगाव दंगलीतील संशयित जनतेचे कलाकारांना मुक्त करा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 12 जुलाई 2021

जुलमी कायदा UAPA रद्द करा रद्द करा, भीमा कोरेगाव दंगलीतील संशयित जनतेचे कलाकारांना मुक्त करा.



अशी मागणी करीत आज भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियान पुण्याचे वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय जवळ प्रचंड निदर्शने करण्यात आले.


प्रचंड पोलिसांचा फौजफाटा उपस्थित होता आंदोलन करण्यास कार्यकर्त्यांना मनाई करीत आंदोलन करते कार्यकर्ते पोलिसांना न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालय च्या मुख्य दारावर आंदोलन केले फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली देत.

स्वराज्य अभियानाचे नेते श्री. मानव कांबळे,माजी नगरसेवक मारुती भापकर,सामाजिक कार्यकर्ते डॉमनिक लोबो, मूलनिवासी मुस्लिम मंचाचे अध्यक्ष अंजुम इनामदार,बहुजन एकता परिषदचे सिद्धार्थ दवे, किशोर कांबळे,मानव सेवा संस्थाचे हनुमंत,कबीर कला मंचाचे कार्यकर्ते,अनिस संस्थाचे नितीन अण्णा, नव समाजवादी परिवारचे मकरंद , नवजवान भारत , सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया चे ताज भाई सिद्दीकी ,डॉ. मंजुर खान समवेत अनेक मान्यवरांचे उपस्थित आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी वरील वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


खोट्या पुराव्यांवर आधारित भीमा-कोरेगाव खटल्यात  अटक केलेल्या सर्व बुद्धिजीवी, कार्यकर्ते आणि कलाकारांची त्वरीत सुटका करा आणि हा खटला रद्द करा.


भीमा-कोरेगाव दंगलीचे खरे आरोपी भिडे-एकबोटे यांना त्वरीत अटक करा.

UAPA हा जुलमी कायदा तात्काळ रद्द करा.


ज्यांनी कम्प्युटर मध्ये खोटे पुरावे पेरले आहेत त्यांची SIT नेमून चौकशी करा


तुरुंगातील विचाराधीन कैद्यांची जामिनावर सुटका करा.


तुरुंगात जेल मॅन्युअल नुसार सोयी-सुविधा अमलात आणा.


असे फलक हातात घेऊन कार्यकर्ते घोषणा देत होते.

शेवटी शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फादर स्टेन स्वामी यांना श्रद्धांजली देण्यात आली.


भीमा-कोरेगाव शौर्यदीन प्रेरणा अभियान, संयोजक श्री.सिद्धार्थ दवे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ याने निवासी उपजिल्हाधिकारी मा. जयश्री कटारे यांना भेटून निवेदन दिले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें