जिंतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने मुस्लिम तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 6 नवंबर 2020

जिंतूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने मुस्लिम तरुणांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी.


संपादक (तेज़्ज़न्युज़24 )अनवर पठान.दि.06/11/2020.  जिंतूर ता. जिंतूर जिल्हा परभणी येथे रस्त्यावर इस्लाम धर्माचे प्रेषित व इस्लाम धर्माविरुध्द अपशब्द वापरणारे फ्राँसचे राष्ट्रध्यक्ष मँक्रो यांचे फोटो रस्त्यावर / रोडवर लावून पायदडी तुडविल्याने रस्ता विद्रूप झाल्याचा जावई शोध लावत जातीय भावनेतून व कोणाच्या तरी दबावाला बळी पडुन सार्वजनिक बांधकाम विभाग जिंतूरचे कर्मचारी मिलिंद प्रधान यांनी दोन प्रमुख व्यक्ति व इतर 25 तरुणांविरुध्द रस्ता विद्रूप करणे, रहदारीस अडथळा करणे या अरोपाखाली जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सदरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. उध्दवजी ठाकरे यांच्याकडे उपजिल्हाधिकारी सेलू यांच्या मार्फत देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

             निवेदनात पुढे म्हटले आहे की, वास्तविक पाहाता भर स्त्यांवर नेहमीच वेग वेगळे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय उत्सव साजरे करण्यासाठी रोड खनुन पेंडाल टाकले जातात, सभामंच उभारले जातात, स्वागत कमानी उभारल्या जातात परंतू या पुर्वि कधीही रस्ता विद्रूप वा खराब केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याचे उदाहरण परभणी जिल्ह्यात ऐकावयास मिळालेले नाही. म्हणजेच मिलिंद प्रधान यांनी दाखल केलेले गुन्हे हे कोणाच्या ना कोणाच्या दबावाला बळी पडून दाखल केलेले आहे.

       शिवाय मुस्लिम समाज व वर्तमान राज्य शासनात समाविष्ट घटक पक्षांमध्ये गैरसमज पसरविण्याचा षडयंत्राचा भाग म्हणुन मुद्दाम हे गुन्हेदाखल करण्याचे कृत्य करण्यात आले असेल अशी शंका निर्माण होत आहे.

      तरी या बाबतीत योग्य ती चौकशी करुन संबधित कर्मचारी वा त्यांचे वरीष्ट अधिकारी यांना निलंबित करुन या प्रकरणात दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरीत मागे घ्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

             निवेदनावर नगरसेवक शेख रहीम शेख गुलाम , नगरसेविका शेख अख्तर बेगम म. अय्युब,  शेख म. अय्युब अनिनोद्दिन ( परभणी जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादि काँग्रेस पार्टि ) नगरसेवक अजिम अ. रहेमान कादरी उर्फ अज्जू कादरी यांची स्वाक्षरी आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें