वालुर ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्याची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

बुधवार, 4 नवंबर 2020

वालुर ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा देण्याची मागणी.

 



प्रतिनिधी.दि.04/11/2020.

सेलु तालुक्यात सर्वात मोठे गाव असलेल्या वालुर या गावाला महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगरी अधिनियम,1965 मधील कलम (ख) व (ग) अनवन्ये लोकसंख्या व औद्योगिक वसाहत क्षेत्रच्या सर्व अटिना वालुर या गावास लागु होत असुन नगर पंचायत- ग्रामीण क्षेत्रातून शहरी क्षेत्रात संक्रमित होत असलेल्या संक्रमित क्षेत्राकरीता नगर पंचायत स्थापन केली जाते. या क्षेत्राची लोकसंख्या किमान १०,००० व  कमाल २५,००० इतकी असावी लागते व वालुर गावची सध्याची अंदाजित लोकसंख्या हि 18,हज़ार पेक्षा हि जास्त असुन वालुर गावची सन 2011 जनगणनेनुसार 11008 इतकि लोकसंख्या आहे व वालुर गावात औद्योगिक कारखाने हि मोठ्या प्रमाणात असल्याने या गावाला नगरपंचायतचा दर्जा देण्याची मागणी वालुर नगरपंचायत निर्माण संघर्ष समितीच्यावतीने एका निवेदनाद्वारे  दि.02/11/2020 रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना मागणी केली असुन मागणीवर योग्य विचार न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदनावर संघर्ष समिचे अध्यक्ष,अनवर पठान.उपाध्यक्ष,रमेश धापसे व सचिव, इरफान ज़मीनदार आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.

1 टिप्पणी: