सिल्लोड (प्रतिनिधी) :- सिल्लोडचे तहसीलदार म्हणून बिलोली जि. नांदेड येथे अवैध धंद्यांचे कर्दनकाळ ठरलेले दबंग तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांची नुकतीच सिल्लोड येथे नियुक्ती करण्यात आली असून आप'च्या वतीने नवनियुक्त तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सत्कार स्वीकारल्यानंतर तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांनी कार्यक्षेत्रातील सर्वसामान्य जनता यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्यांना न्याय देण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगीतले आणि जर कार्यालयात कोणी अडवणूक करीत असेल तर थेट संपर्क करण्याचे आवाहन देखील तालुक्यातील जनतेला केले. तसेच तालुक्यामध्ये शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगून महसुली अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे जे अभिलेख तांत्रिक लेखन प्रमाणाने दोष आहे, ते प्राधान्याने दुरुस्ती करिता स्वतंत्र कार्यक्रम राबवण्याचे आश्वासन देखील यावेळी त्यांनी दिले. तहसीलदार श्री विक्रम राजपूत यांची एक स्वतंत्र आणि दबंग ओळख असल्याने त्यांचे आप'च्या वतीने स्वागत करण्यात आले असून यावेळी जिल्हा सहसंयोजक ॲड. शेख उस्मान शेख ताहेर, सिल्लोड - सोयगांव विधानसभा संयोजक महेशकुमार शंकरपेल्ली, तालुका संयोजक डॉ. दत्तात्रय गोंगे, शहर संयोजक शेख रफीक अब्दुल रहीम, संघटनमंत्री इस्माईल शेख सलीम शेख, तालुका सहसंयोजक नजीर तडवी, आप पालक अघाडीचे असलम खान पठाण, शहर सचिव इम्रान देशमुख, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुस्ताक खा मेवाती, दौड फकीरा शेनफड, सुनील पाटील गुळवे, मुक्तार शहा मुसा शहा आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शनिवार, 17 अक्टूबर 2020
Home
औरंगाबाद
आम आदमी पक्षाच्या वतीने सिल्लोडचे नवनियुक्त तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांचे स्वागत.
आम आदमी पक्षाच्या वतीने सिल्लोडचे नवनियुक्त तहसीलदार श्री. विक्रम राजपूत यांचे स्वागत.
सदस्यता लें
टिप्पणियाँ भेजें (Atom)
Author Details
Templatesyard is a blogger resources site is a provider of high quality blogger template with premium looking layout and robust design. The main mission of templatesyard is to provide the best quality blogger templates which are professionally designed and perfectlly seo optimized to deliver best result for your blog.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें