मुस्लिम आरक्षणसाठी सेलूत नगराध्यक्ष विनोद बोराडे चा घेराव करण्यात आला.. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 25 सितंबर 2020

मुस्लिम आरक्षणसाठी सेलूत नगराध्यक्ष विनोद बोराडे चा घेराव करण्यात आला..



    सेलू (अनवर पठाण) दि.25/09/2020.

             मुस्लिम समाजाला शिक्षण व शासकीय नौकरीत १०% आरक्षण मिळावे या मागणीसाठी " मुस्लिम आरक्षण निर्णायक आंदोलन" तर्फे संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक २१ सप्टेंबर ते दिनांक ३० सप्टेंबर दरम्यान लोक प्रतिनिधिंना घेराव करुन निवेदन देण्यात येत आहे.

       याचाच भाग म्हणुन सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांना युथ फोरमच्या युवकांनी घेराव करुन निवेदन सादर केले.

         निवेदनात म्हटले आहे की, या पुर्वि ७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे  मा. मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन मुस्लिम समाजाला १० % आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. परंतू त्यावर कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे महाराष्ट्रातील सरपंच ते संसद सदस्य यांना घेराव करुन निवेदन देण्यात येत आहे. आपन ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करता त्यांना मुस्लिम आरक्षणासाठी प्रत्न करण्याची मागणी करावी. आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु व त्या वेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्यास शासन, प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी.

         या प्रसंगी शेख साजीद, शेख मुखिद, अमजद बागवान, डॉ. मुताहेर खान, दाऊद खान, करीम खान, अमजद पठाण, मो. रमजानी,   वहाब कुरैशी, अ. इमरान, रहीम सारवान, एजाज खान अदि युवक उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें